ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक गणपतराव निंबाळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
लातूर: दिनांक 17/03/2024 रोजी देसाई नगर लातूर येथे, मराठवाडा मुक्ती संग्राम मधील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक गणपतराव नारायणराव निंबाळकर व त्यांच्या पत्नी सुंदर गणपतराव निंबाळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक श्रद्धानंद सरस्वती वय वर्ष 111,गणपतराव निंबाळकर यांची कन्या सौ.विमलताई आकनगीरे व सौ.डॉ.कमल विलेकर, त्यांचे नात जावाई आंध्र प्रदेश चे प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. दीपक मांडवे, श्री. रामदास श्रीमंगले (PSI) नांदेड, श्रीमती.रुक्साना मुल्ला राज्य सरचिटणीस अनिस महाराष्ट्र राज्य, श्री.प्रभाकर रायकर माझी सैनिक शांती दूत (साऊथ आफ्रिका),बसवंत अप्पा उबाळे, अँड. कृष्णनाथराव अकनगीरे, श्री.सुर्यकांत हुल्सुरकर हे होते.

पुतळ्याचे अनावरण ऍड. अण्णाराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक गणपतराव निंबाळकर यांच्या कर्तुत्वा बद्धल सर्वांनी आपले विचार मांडले. निंबाळकर कुटुंबं हे त्यांच्या आई वडिलांच्या विचार धारेवर तायार झालेले मराठवाड्यातील कृतिशील आदर्श कटुंब आहे असे भाव सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. हा पुतळा अनावरण सोहळा श्री. रणजित गणपतराव निंबाळकर व सौ. शकुंतला रणजित निंबाळकर यांच्या सक्रिय पुढाकाराने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने लोक सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील स्वतंत्र सैनिकांचे परीवार व निंबाळकर परिवार यांनी परिश्रम घेतले.