निलंगा :-महाराष्ट्राची सांस्कृती फक्त अनेकांच्या भाषणातून ऐकण्यास मिळते. शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र असे संबोधित केले जाते. मात्र त्याचे कृतीतुन जतन केले जात नाही. मात्र लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील कांग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुनीताताई दयानंद चोपणे यांचे चिरंजीव प्रा.किरण दयानंद चोपणे व शिवली येथील राजेंद्र मुळे यांची जेष्ठ कन्या चि. का.साक्षी यांचा शुभ विवाह सोहळा दि.१७ मार्च रविवारी बसवेश्वर मंगल कार्यालय येथे सर्व धर्माचे धर्मगुरू यांच्या शुभ आशीर्वादाने एक ऐतिहासिक विवाह सोहळा संपन्न झाला.यावेळी सर्वधर्मसमभाव ची चोपणे परिवारच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला शिकवण देणारे चोपणे परिवाराचे श्रद्धास्थान माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करत विवाह सोहळ्याची सुरुवात झाली.विशेषतः म्हणजे या विवाह सोहळ्यात अक्षदा तांदळाचे पायात दुळवत जातात त्यामुळे अन्न हे वाया जातो. त्यामुळे तांदळाचे अक्षदा न देता फुलांच्या पाखळ्या देऊन एक आगळा वेगळा सोहळा पार पडला.

या शुभ विवाह प्रसंगी विवाह सोहळ्यात व्यासपीठावर निलंगायत धर्माचे धर्मगुरू मठाधिपती येरटे महाराज,हिंदू धर्माचे धर्मगुरू वेधआचार्य श्रीपाद माधव आचार्य,मुस्लिम धर्माचे धर्मगुरू सय्यद शहा हैदरवली उल्लाह नबिरा खादरी, शिख धर्म गुरू सरदार लव्हप्रित सिंग पाटिया, जैन धर्माचे गुरू राहुल शहरकर, बौद्ध धर्माचे पूजनीय भन्ते सुमेध नागसेनजी,ख्रिचन धर्माचे धर्मगुरू शॅनिव्हल रेवंट गोपाल,आप आपल्या धर्माच्या पद्धतीने वधू वराना शुभ आशीर्वाद देत शुभ संदेश या व्यासपीठावर सर्व जाती धर्माचे धर्मगुरू नव्हे तर हेच आपला खरा भारत व लोकशाही भारत असल्याचे मत सर्व धर्मगुरू यांनी व्यक्त करत उपस्थिताना मानवेतचा, ऐकतेचा, माणुसकीचा, व सर्वधर्मसमभाव चा संदेश देत शुभ आशीर्वाद दिले.
महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा जतन करण्याचं कार्य चोपणे परिवाराने आपल्या चिरंजीव किरण चोपणे व चि. का. साक्षी यांच्या विवाह सोहळ्यात सर्व धर्माचे धर्मगुरू यांच्या शुभ हस्ते त्या त्या धर्माच्या मंगल आष्टीका करून सर्वधर्मसमभाव कृतीतुन करून शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या खऱ्या महाराष्ट्राच्या विचाराचे संगोपन करत त्याचे वटवृक्ष करण्याचा काम प्रा दयानंद चोपणे व सौ. सुनीता दयानंद चोपणे यांनी हजारो आमंत्रित निमंत्रित मान्यवरांच्या व पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या साक्षीने संपन्न केला…
यावेळी उपस्थित विविध राजकीय नेते, पदाधिकारी, डॉक्टर्स, वकील, पत्रकार, व्यपारी, पाहुणे हे दृश्य पाहून टाळ्यांचा कडकडाट या विवाह सोहळ्याचे स्वागत करत चोपणे परिवाराचे कौतुक केले.
या विवाह सोहळ्यासाठी शुभ संदेश सह आशीर्वाद कांग्रेस चे विधिमंडळाचे विरोधीपक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार,अन्न नागरी सुरक्षा पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार, आ.धीरज देशमुख यांनी शुभेच्छा पत्र पाठवुन वधू वराना शुभ संदेश देत शुभ आशीर्वाद दिले. तर प्रत्यक्षात उपस्थित राहवून वधू वराना शुभ आशीर्वाद देण्यासाठी धाराशिव चे खा. ओमराजे निंबाळकर, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे, कांग्रेस चे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,कांग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके, देवणी कांग्रेस चे जेष्ठ नेते मालिकार्जुन मानकरी सावकार,शरद पाटील निलंगेकर,शिवसेनेचे नेते लिंबन महाराज रेशमे,डॉ व्यंकटराव डावळे फाउंडेशन चे संस्थापक सदस्य डॉ अरुण डावळे, महाराष्ट्र माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पद्ममकर वाघमारे,सचिव भारत काळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंडीत धुमाळ,अंख्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.