जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे ता. जि. उस्मानाबाद येथील 45 विद्यार्थ्यांना स्व.चंद्रशेखर गोविंदराव यरमलवार यांच्या 06 पुण्यस्मरणानिमीत्त शैक्षणिक साहित्य वाटप
शिरूर अनंतपाळ ता. शिरुर अनंतपाळ जि. लातूर येथील प्रसिद्ध व्यापारी स्व.चंद्रशेखर गोविंदराव यरमलवार यांच्या 6 व्या पुण्यतिथीनिमित्त श्री. बालाजी चंद्रशेखर यरमलवार, इंजि.केदार संजय यरमलवार यांच्या वतीने 26000 रूपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मंथन परीक्षेतील 09 विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण 36 अशा एकूण 45 विद्यार्थ्यांना पाच रजिस्टर, एक कंपास,एक पेन चा संच व 525 मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.शाळेची गुणवत्ता, मंथन व शिष्यवृत्ती,नवोदय निकाल लक्षात घेऊन आपल्या शाळेची निवड केल्याचे यरमलवार कुटुंबियांनी सांगितले. या वेळी सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती रुक्मण गुंठे व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शिवलिंग माधवराव शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले…तसेच यरमलवार परिवाराचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगीतले. इंजि. केदार यरमलवार यांनी आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ गेली सहा वर्षांत सहा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत असून ही परंपरा कायम राहील असे सांगताना आजोबांच्या स्मृतींना उजाळा दिला.मार्गदर्शक शिक्षक या मध्ये श्रीमती. अंबिका कोळी,श्रीमती. संगिता पाटील, श्रीमती. शर्मिला जमाले यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अजय जानराव यांनी शाळेतील विविध उपक्रम सांगून यरमलवार कुटुंबीयांची दानशूरता व समर्पण वृत्ती याबद्दल आपल्या अध्यक्षीय समारोपात उल्लेख करून त्यांचे या सत्कार्याबददल आभार मानले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक तथा शिरुर अनंतपाळ येथील सुपुत्र गोविंद देवशेटवार गुरुजी यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब जमाले यांनी केले. आभारप्रदर्शन रामकृष्ण ढवळे यांनी केले.