महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गावात सतत विजपुरवठा होतो खंडीत.
मिटर न बसविताच अनेक लोकांना येते विजबिल. तर प्रतिमहिना विजबिल भरणाऱ्या लोकांनाही आले हजारो रुपयांचे विजबिल.
औराद शा (प्रतिनिधी):-निलंगा तालुक्यातील औराद शहाजणी येथील अनेक भागात गेल्या महिनाभरापासून सतत विजपुरवठा खंडीत होत आहे तसेच अनेक लोकांच्या घरी मिटर न बसविताच दर महा विजबिल येत आहेत तसेच अनेक लोकांनी प्रतिमहा विजबिल भरणा करुनही कमीत कमी सात हजार व जास्तीत जास्त ऐंशी हजार रुपये विजबिल आणी तेही घरगुती वापराचे आल्यामुळे लोकांमध्ये महावितरण विषयी राग आनावर आलेला आहे तसेच येथील सहय्यक अभियंता खामकर हे कार्यालयात सतत गैरहजर व मुख्यालयी राहत नसल्याने अनेक कर्मचारी सुध्दा कर्तव्यात हलगर्जीपणा करत आहेत त्यामुळे नावाला सेवा व फक्त अधिकारी खातात मेवा त्यामुळे येथील महावितरण कार्यालय असून अडचण नसुन खोळंबा म्हणन्याची वेळ आली आहे.
गावात मात्र खुलेपणाने दिवस-रात्र कांही भागात आकडे टाकुन विजेचा वापर होत आहे आणी याला मात्र औरादचे सहाय्यक अभियंता खामकर यांना मात्र याचा काहीच फरक पडत नाही उलट अनेक लोकांना या अधिकाऱ्यांनी विजबिलाची थकबाकी आसतानाही कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावे नविन विज कनेक्शन दिले आसल्याचे पहावयास मिळत आहे तसेच अनेक कुटुंबात या अधिकारी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या मार्फत विजकनेक्शन साठी अर्ज आले नसतानाही अनेक कुटुंबात पोलवरील विज बॉक्स मधून वीज कनेक्शन दिल्याचे दिसत आहे. तसेच अनेक विजग्राहकांना फक्त डिमांड दिले पण मिटर न बसविताच विजकनेक्शन दिलेले दाखविल्यामुळे अनेक विजग्राहकांना अंदाजे विजबिल येत आहेत आणी या ग्राहकांनी भरणा नाही केला तर त्यांच्यावर विजचोरीची कार्यवाही करण्याची भिती घालत आसल्याचे प्रकार पहायला मिळत आहेत. तसेच अनेक भागातील रोहीत्र उघडे पडलेले आसुन पुर्णपणे खराब अवस्थेत पडलेले आहेत.
येथील महावितरण विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या हलगर्जीपणाचे अनेक वेळा तोंडी तक्रारी तर केलेल्या आहेत मात्र अमोल ढोरसिंगे या विजग्राहकाने कार्यकारी अभियंता व उपअभियंता महावितरण कार्यालयात रीतसर तक्रार देऊन संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.