• Thu. May 8th, 2025

निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला ६,९८६ कोटींचा निधी; आयोगाकडून २०१८-१९ची माहिती उघड

Byjantaadmin

Mar 18, 2024

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने रविवारी निवडणूक रोख्यांविषयी अधिक माहिती जाहीर केली. त्यात २०१८ ते १२ एप्रिल २०१९ या कालावधीतील रोख्यांविषयी तपशिल आहेत. नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार २०१८-१९ या काळात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सर्वाधिक ६,९८६.५ कोटींचा निधी मिळाला. त्याखालोखाल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला १,३९७ कोटी तर काँग्रेसला १,३३४ कोटी रुपये आणि बीआरएसला १,३२२ कोटी रुपये प्राप्त झाले.

सँटियागो मार्टिन यांची ‘फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस’ ही निवडणूक रोखे खरेदी करणारी सर्वात मोठी कंपनी होती. तिने २०१८-१९ या काळात एकूण १,३६८ कोटींचे रोखे खरेदी केले. त्यापैकी ३७ टक्के, म्हणजे ५०९ कोटी रुपयांचा निधी तिने तामिळनाडूतील द्रमुकला दिला. याशिवाय द्रमुकला मेघा इंजिनिअरिंगकडून १०५ कोटी, इंडिया सिमेंट्सकडून १४ कोटी आणि सन टीव्हीकडून १०० कोटी रुपये प्राप्त झाले. द्रमुकला एकूण ६५६.५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. बीजेडीला ९४४.५ कोटी, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसला ४४२.८ कोटी रुपये प्राप्त झाले. जेडीएसला एकूण ८९.७५ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी ५० कोटी रुपये एकट्या मेघा इंजिनिअरिंगकडून मिळाले होते. टीडीपीला १८१.३५ कोटी, शिवसेनेला ६०.४ कोटी, आरजेडीला ५६ कोटी, सपाला १४.०५ कोटी रुपये मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *