• Thu. May 8th, 2025

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024-बातम्या

Byjantaadmin

Mar 19, 2024

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

निवडणूक काळात परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास मनाई

लातूर, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंत पर्वण दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर भारत निवडणूक आयोगाच्या 8 जून 2023 रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील शासकीय कर्तव्ये पार पडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी आणि कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त सर्व परवाना धारक व्यक्तींना परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर बंदी घातली आहे. हे आदेश 10 मे 2024 पर्यंत अंमलात राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लातूर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध लागू

लातूर, दि. 19 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्यघटनेचे कलम 324 खाली प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निवडणुका विना अडथला व शांततेत पार पडण्य्साठी निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) वापरावर आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. त्यामुळे निवडणूक काळात लातूर जिल्ह्यात ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केला आहे.

कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी यांची रीतसर परवानगी घेवून करता येईल. असा वापर करत असताना वाहन चालू ठेवून ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकांच्या वापरास वाहनावर बसवून किंवा अन्य प्रकारे दररोज सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी अथवा निवडणुकीचे उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकांचा वापर वाहन्वर बसवून किंवा अन्य प्रकारे करणाऱ्या लोकांनी ध्वनीक्षेपकाच्या वापराचे परवानगी विवरण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्म्गीत केलेल्या आदेशात म्हटले आहे.

तसेच या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हे आदेश लातूर जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या हद्दीत 10 मे 2024 पर्यंत अंमलात राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

****

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींबाबत आदेश निर्गमित

लातूर, दि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी यांच्या कार्यालयात येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा नसावा. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दलाहानात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 10 मे 2024 पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष कार्यान्वित दूरध्वनी क्रमांकावर नोंदविता येणार तक्रार

लातूर, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली आहे. याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता विषयक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष 24 तास सुरु राहणार आहे.

लातूर जिल्ह्यात तसेच लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाच्या 02382-224477 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित राहणार असून या कक्षात नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी दूरध्वनीद्वारे प्राप्त तक्रारींची दखल घेवून पुढील आवश्यक कार्यवाही करतील. तसेच निवडणुकीसंदर्भात मदत हवी असल्यास 02382-224477 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *