• Thu. May 8th, 2025

बिहारमध्ये NDA चं जागावाटप जाहीर; भाजप, जेडीयूला मिळाल्या ‘इतक्या’ जागा

Byjantaadmin

Mar 18, 2024

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जागावाटपावर एकमत झालं आहे. भाजप, जेडीयू, एलजेपी (आर) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांपैकी भाजप १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे तर १६ जागांवर नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) निवडणूक लढवेल. चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर जीतन राम मांझी यांचा हम एका जागेवर निवडणूक लढवले. एक जागा उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला देण्यात आलेली आहे.

कोणत्या जागा भाजप लढवणार?

पश्चिम चंपारण, पू्र्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुजफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियापूर, बेगुसराय, नवादा, पटनासाहिब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर आणि सासाराम या जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार आहे.

जेडीयूला सोडलेल्या जागा कोणत्या?

वाल्मिकी नगर, सीतामढी, झंझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जहानाबाद आणि शिवहर या लोकसभा मतदारसंघामधून जेडीयू उमेदवार उभे करणार आहे.

दुसरीकडे चिराग पासवान यांचा पक्ष वैशाली, हाजीपूर समस्तीपूर, खगडिया आणि जमुई या जागा लढवणार आहे. जेडीयू खासदार संजय झा म्हणाले की, बिहारमध्ये एकतर्फी लाट आहे. विरोधी पक्षामध्ये आता कोणाचीही तयारी दिसून येत नाहीये. आम्ही सगळे मिळून सर्वच ४० जागा जिंकणार आहोत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *