• Wed. Apr 30th, 2025

जागतिक महिला दिनानिमित्त युवती व्याख्यानमाला

Byjantaadmin

Mar 14, 2024

जागतिक महिला दिनानिमित्त युवती व्याख्यानमाला 

निलंगा:-महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा आणि चला कवितेच्या बनात उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र महाविद्यालयात दिनांक 12 मार्च 2024 महिला सक्षमीकरण कक्ष आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त युवती व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्र महाविद्यालयाने चला कवितेच्या बनात या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेबरोबर सामंजस्य करार  केला.

  जागतिक महिला दिना निमित्य आयोजित या युवती व्याख्यान मालेत महाविद्यालयातील दहा विद्यार्थिनींनी ऐतिहासिक काळातील कर्तुत्वान स्त्रिया, समाजकारण, राजकारण, साहित्यिक समाज सुधारक स्त्रिया, वैद्यकीय, कला व संगीत, गिर्यारोहक तसेच आधुनिक भारतातील समाजसेवा अशा विविध क्षेत्रात पहिले पाऊल टाकणाऱ्या ज्या काही कर्तृत्ववान स्त्रिया होत्या त्यांना ते पहिले पाऊल टाकत असताना त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष याचा विस्तृत  आराखडा विद्यार्थिनी आपल्या व्याख्यानमालेतून प्रेक्षक वर्गापुढे मांडला आणि त्या त्या क्षेत्रामध्ये आधुनिक काळातील स्त्री ताठ मानेने पुरुषाच्या बरोबरीने आपले काम करत आहे हेही सांगितले. यावेळी विचार पिठावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एन कोलपुके सर, शिवाय या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चला कवितेच्या बनात चळवळीचे समन्वयक आनंत चंपाई माधव कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हसूरीचे मुख्याध्यापक शिवराजगीर गोस्वामी, तसेच प्रसिद्ध साहित्यिका औराद शहाजानी, शांताताई गिरबने. प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक डॉ.हंसराज भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर चौधरी आणि महिला सक्षमीकरणाच्या समन्वयक प्रा. घोगरे मनीषा हे होते.

यामध्ये शिवराजगीर गोस्वामी सरांनी मंचावरती व्याख्यान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय काय तयारी करावी याचे सखोल मार्गदर्शन केले. तर आनंत चंपाई माधव कदम सर बोलत असताना म्हणाले की वक्तृत्व ही एक कला असून ती जर अवगत केली तर विद्यार्थिनींचे भविष्य फार उज्वल असेल. याप्रसंगी शांताबाई गिरबने  स्त्रियांनी मोह माया या जाळ्यात अडकून न पडता योग्य त्या कामाला प्राधान्य द्यायला शिकले पाहिजे तरच ती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करु शकते. विश्वास हा अतिशय मोलाचा दागिना आहे तिने त्याला तडा जाऊ देता कामा नये. स्त्री ही पुरुषाशिवाय अपूर्ण आहे तर पुरुष हा स्त्रीशिवाय त्यांनी असे प्रतिपादन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एन कोलपूके प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आणखीन पुढे येणे किती आणि कसे गरजेचे आहे यावरती भाष्य केले. तसेच यांनी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.हंसराज भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा अनुराधा महाजन यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शुभांगी पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सोनम पाटील, प्रा. रेश्मा चौधरी,प्रा. शिल्पा कांबळे, प्रा.मनीषा वारद ,प्रा. पृथ्वी फावडे, दत्ता माने, नामदेव गाडीवान, सुनील वाकळे, सिद्धेश्वर कुंभार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *