बेंडगा ग्रामपंचायतीच्या वतीने लाभार्थी मेळावा संपन्न
निलंगा : शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी योजनांच्या अनुषंगाने तालुक्यातील बेंडगा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरिकांना वयक्तीक लाभाच्या योजनांचे कार्यारंभ आदेश वितरीत करण्यासाठी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच मोहरबाई तातेराव धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन दगडू सोळुंके, संगांयो कमिटीचे अध्यक्ष शेषेराव ममाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष कुमोद लोभे अदी उपस्थित होते. या मेळाव्यात माजीमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निर्देशानुसार गावातील १२३ लाभार्थ्यांना वयक्तीत लाभ यामध्ये सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, श्रावणबाळ योजना अदीं योजनांचा कार्यारंभ आदेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन दगडू सोळुंके म्हणाले गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबर प्रत्येक नागरिकाचा वयक्तीक विकास झाला पाहिजे. माजीमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर व माजी खा रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या सुचनेनुसार गाव खेड्यात राहणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक उंबरठ्याचा विकास झाला पाहिजे. अशा त्यांच्या सुचनेवरुन निलंगा मतदारसंघातील प्रत्येक गावच्या विकासाबरोबरच वयक्तीक विकासावर भर देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तर संगांयो कमिटीचे अध्यक्ष शेषेराव ममाळे म्हणाले. संगयो च्या माध्यमातून आगामी काळात तालुक्यातील एकही निराधार श्रावणबाळ योजनेपासून वंचित राहणार नाही अशा सुचना माजीमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिल्या असून त्या दृष्टीने कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या प्रास्ताविकात सत्यवान धुमाळ यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सुकन्या व कन्यादान योजनेच्या लाभाचे वाटपही लवकर करणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामसेवक राजकुमार तोडकर, उपसरपंच वैजनाथ तळबुगे, चेअरमन शिवाजी धुमाळ, मेजर गोविंद धुमाळ, माजी सरपंच ओमगीर गीरी, प्रकाश धुमाळ, पंढरी तळबुगे, आनंत सोळुंके, आगंद धुमाळ, गोविंद सोळुंके, संजय सबनीस, ग्रा.प.सदस्य छायाताई गिरी, उषाबाई धुमाळ, दैवतबाई सुर्यवंशी, सुरेखा धुमाळ, निर्मला बिराजदार, सिध्देश्वर धुमाळ, नामदेव धुमाळ अदीसह ग्रामस्थ व सर्व लाभार्थी उपस्थित होते. आभार माजी सरपंच श्रीमंत धुमाळ यांनी मानले.