• Fri. May 2nd, 2025

राहुल गांधी सर्वांचे नेते, खासदार संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

Byjantaadmin

Mar 14, 2024

नाशिक | 14 March 2024 : राहुल गांधी यांची न्याय यात्रा आता मुंबईकडे निघाली आहे. भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर देशात पूर्व-पश्चिम न्याय यात्रेला मुहूर्त लागला. त्याच दरम्यान भाजपने काँग्रेसमध्ये खिंडार पाडण्यास सुरुवात केली. INDIA आघाडीतील घटक पक्षांनी पण काँग्रेसच्या भूमिकेला पश्चिम बंगाल, काश्मिरमध्ये विरोध केल्याचे चित्र आहे. पण महाराष्ट्रात या यात्रेत वेगळे चित्र दिसले. राहुल गांधी हे आपल्या सगळ्यांचे नेते असल्याचे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडी भक्कम असून ती RAHUL GANDHI यांच्या पाठिशी असल्याचा इशाराच जणू देण्यात आला आहे.

काय म्हणाले राऊत

राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत चांदवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी गांधी यांची स्तूती केली. राहुल गांधी हे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत. संपूर्ण देशामध्ये भारत जोडो न्याय यात्रा घेऊन ते महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर या यात्रेत कश्मीरमध्ये चाललो आहे. हा नेता देश जोडण्यासाठी माणसांची मन जोडण्यासाठी या देशांमध्ये चालतो आहे, असे गौरद्वगार त्यांनी काढले.

नई रोशनी

मला यावेळी इंदिरा गांधी आठवंत आहेत. इंदिरा गांधी जेव्हा देशांमध्ये राजकारण करत होत्या तेव्हा एक घोषणा आम्ही सगळेच देत होतो ‘इंदिरा गांधी आई है नही रोशनी लाही है’ आज तीच नवी रोशनी घेऊन, नवा प्रकाश घेऊन या देशात आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राहुल गांधी हजारो किलोमीटर या देशांमध्ये चालतायेत. लोकांना भेटताहेत. लोकांशी चर्चा करत असल्याचे राऊत यांनी कौतुक केले.

मन की बात ऐकतात

राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकताहेत, स्वतःच्या मन की बात फार कमी बोलत आहेत. काही लोक फक्त आपल्याच मन की बात सांगता येते. माझंच ऐका, दुसरं कोणाचा ऐकायचं नाही, असे त्यांचे धोरण असल्याचे सांगत राऊत यांनी पंतप्रधान मोदीं याच्यावर निशाणा साधला. राहुल गांधीचं मी पाहतोय ते शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मन की बात ऐकताहेत आणि त्या संदर्भात आपल्या भूमिका व्यक्त करतात. राहुल गांधी आता दोन दिवसात मुंबईला पोहोचतील महाराष्ट्राच्या राजधानी पोहोचतील. तिथे त्यांचे भव्य स्वागत केलं जाईल, असे ते म्हणाले.

माणसं भाड्याने आणली नाहीत

या देशांमध्ये मोदींसाठी अमित शहा यांच्या सभेसाठी ज्या प्रकारे भाड्याने लोकांना आणले जाते. तसे या भारत जोडो यात्रेमध्ये भारत न्याय यात्रेमध्ये जाण्यासाठी सभेसाठी भाड्याने लोक आणले नाहीत. लोक स्वतःहून येतात. लोक स्वतःहून चालताहेत. लोक स्वतःहून आपल्या विचार मांडतात आणि हेच आपल्या देशामध्ये परिवर्तन असल्याचे ते म्हणाले. गद्दार आमदार आणि खासदाराला 50- 50 कोटी रुपये भाव मिळतो. पण कांद्याला भाव मिळत नसल्याची टीका त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *