• Sat. May 3rd, 2025

…तर बारामतीप्रमाणेच रावेरलाही नणंद-भावजय सामना रंगणार

Byjantaadmin

Mar 14, 2024

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपने raksha khadse यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. यावर मंत्री gulabrao patil यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

रक्षा खडसे यांना उमेदवारी घोषित होताच राष्ट्रवादी काँग्रेस यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काल बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु एकनाथ खडसे यांनी तब्येत ठीक नसल्याचे म्हटले. डॉक्टरांनी परवानगी दिली तर निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या भावजय ROHINI KHADSE यांना उमदेवारी देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत झाली होती. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली तर नणंद-भावजय लढतयावर गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपाने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुती म्हणून ते जे उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत. रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांच्या नावाच्या चर्चा आहेत. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली तर बारामतीप्रमाणे रावेरमध्येही नणंद-भावजय असा सामना पाहायला मिळू शकणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. JALGAON जिल्ह्यातील बामाभोरी गावात विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *