• Fri. May 2nd, 2025

निलंगा-राठोडा मार्गावर अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Byjantaadmin

Mar 12, 2024

निलंगा : आंबूलगा-मेन ता. निलंगा गावाजवळ निलंगा ते राठोडा या जिल्हा मार्गावर ऊस भरून निघालेला ट्रॅक्टर व मोटरसायकल मध्ये मंगळवारी ता. १२ रोजी भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण अत्यावश्य असून त्यास उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक माहिती अशी की निलंगा तालुक्यातील आंबुलगा- मेन या गावाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास ऊस भरून दोन ट्रॉलीसह निघालेल्या ट्रॅक्टर व समोरून येणाऱ्या मोटरसायकलीमध्ये भीषण अपघात झाला.

मोटरसायकल वरील तिघेही या उसाच्या ट्रॅक्टर खाली चिरडले गेले आहेत. एकाचे मुंडकेच चिरडल्याने फक्त रस्त्यावर धंडच पडले होते तर दुसऱ्याही जाग्यावरच मृत्यू झाला होता. हा भीषण अपघात पाहणाऱ्यांच्या मात्र अंगावर शहारे उभा टाकल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांनी सांगितले. या अपघातात गोविंद पांडुरंग कांबळे वय ३५ वर्ष राहणार राठोडा व दिनकर रावसाहेब तोंडवळे वय ४५ राहणार आंबुलगा मेन यांचा जागीच मृत्यू झाला असून गोविंद

मारुती गायकवाड वय २५ वर्ष हा तरुण मात्र अत्यावस्त असल्याने यास लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सकाळची अपघाताची घटना घडल्याची माहिती निलंगा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन निलंगा चे पोलीस निरीक्षक बालकृष्ण शेजाळ, सुनील पाटील, विनोद गोमारे,

खंडू कांबळे आदी पोलिसांनी पंचनामा करत घटनास्थळावरून शवविच्छेदनासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले व अत्यावशता असलेल्या एकास तातडीने लातूरला हलविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी सांगितले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली चिरडून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी घटनास्थळावर आक्रोश व्यक्त करत ट्रॅक्टर वर दगडफेक करत आपला रोष व्यक्त केला. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या एकाच हेडला दोन ट्रॉली जुडवून रस्त्याने जात.

असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वारांना त्याचा अंदाज आला नसावा म्हणून हे तिघेजण चिडले असावेत असा अंदाज प्रत्यक्ष दर्शनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *