रंगला सामना स्नेहाचा
…ग्रीन लातूर वृक्ष टीम
ग्रीन लातूर वृक्ष टीम आणि रॉबिन हुड आर्मी या दोन्ही निःस्वार्थ सामाजिक सेवा करणाऱ्या टीमच्या सदस्यांनी घेतला टर्फ क्रिकेट चा मनसोक्त आनंद. ग्रीन लातूर वृक्ष टीम हे नाव ऐकले किंवा वाचले की, प्रत्येक लातूरकरांच्या डोळ्यासमोर येतो तो २० ते २५ सदस्यांचा पिवळ्या टीशर्ट मधील वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करणारा कार्यमग्न घोळका. लातूर वृक्ष टीम अविरत मागील १७४५ दिवसापासून निःस्वार्थ सेवा देत हरीत लातूर, स्वच्छ लातूर आणि सुंदर लातूर करीता परिश्रम घेताना प्रत्येक लातूरकर पाहत आहेत.त्याचप्रमाणे रॉबिन हुड आर्मी चे सदस्य अन्नाचा एकही कण वाया गेला नाही पाहिजे त्याकरिता लातूर शहरातील मंगलकार्यालय, किंवा घरगुती कार्यक्रमातील शिल्लक अन्न गरजवंत किंवा ज्यांना त्या अन्नाची किंमत आहे अश्या ठिकाणी ते शिल्लक अन्न स्वतःच्या वाहनाने आणि कष्टाने घेऊन जाऊन त्या अन्नाचे वाटप करतात. त्यामुळे अन्नाची नासाडी होत नाही, आणि काही जणांची भूक भागवली जाते हा ही एक निःस्वार्थ हेतू. त्याच बरोबर रॉबिन हुड आर्मीचे कौतुकास्पद कार्य म्हणजे ते प्रत्येक सुट्टीच्या दिवशी अतिशय गरीब, झोपडपट्टी किंवा शिक्षणाचे महत्व नसलेल्या ठिकाणी जाऊन तेथील लहान मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून त्यांना शिक्षणाची आवड निर्माण करणेचे मोलाचे कार्य ही टीम करते.

ग्रीन लातूर वृक्ष टीम आणि रॉबिन हुड आर्मी या दोन्ही टीम करत असलेल्या सामाजिक कार्याची आणि सदस्यांची ओळख तसेच आजून नवीन्यपूर्वक संकल्पनांची देवानघेवाण होईल या हेतूने या दोन टीम मध्ये क्रिकेटचा सामना खेळण्याचे ठरवले. ठरल्या प्रमाणे दोन्ही टीम मधील सर्व सदस्यांनी उत्सपूर्त प्रतिसाद देत या अनोख्या सामन्याचा आनंद घेतला. सामना म्हणले की एकदम चुरस, हार-जीत, प्रतिस्पर्धी हरला पाहिजे आपण जींकलो पाहिजे, असे वातावरण म्हणजेच सामना किंवा स्पर्धा, हा अलिखित नियम मोडीत काढत, अतिशय प्रेमाने, आनंदी वातावरणात १० षटकाचे ३ क्रिकेटचे सामने खेळण्यात आले. इथे काढलेली प्रत्येक धाव ही जिकण्यासाठी काढलेली नसून आपल्यातील स्नेह अधिक वाढवा यासाठी होती.
निश्चितच काल झालेल्या सामान्यमध्ये कोण हरलं कोण जिंकले या पेक्षा दोन्ही टीमचे सदस्यांनी एकमेकांचे मन नक्कीच जिंकले असाच काही प्रत्यक्ष दर्शनीनांती अनुभव आला. एक क्षण तर असा होता पराभूत संघ एवढ्या उत्साहात जल्लोष करत होता, त्यावेळी विजयी संघास नक्कीच विचार पडला असेल जिंकलंय कोण?पराभूत संघास माहिती होत आपण सामना तर हरलोय, पण एका नवीन मित्राचे मन, प्रेम आणि स्नेह जिंकलेला आहे, हाच आपला उद्धेश सफल झाल्याचा आनंद होय.या प्रेमाचा, या स्नेहचा समाजासाठी उपयोग करू, निःस्वार्थ समाजसेवेची मिळुनी कास धरू.असे मत डॉ. पवन लड्डा व नंदन भुतडा यांनी व्यक्त केले.