देशाचा विकास साधण्याची क्षमता काँग्रेस पक्षातच-आमदार धिरज देशमुख यांचा विश्वास
आमदार धिरज देशमुख यांचा विश्वास; काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आपल्या उमेदवाराला आशीर्वाद द्या लातूरात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला उत्साहात सुरवात
लातूर -काँग्रेसने आजवर देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. यापुढेही देशाचा विकास साधण्याची क्षमता काँग्रेस पक्षातच आहे. वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढती असुरक्षितता यावर मात करून सर्वसामान्यांना, तरुणांना, महिलांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम काँग्रेसच करू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आपल्या उमेदवाराला भरभरून आशीर्वाद द्यावा, असे आवाहन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणावर ‘लातूर तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा’ रविवारी (ता. १०) आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.यावेळी माजी आमदार श्री. वैजनाथ शिंदे, माजी आमदार श्री. त्र्यंबक भिसे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्ष संयमी, सुसंस्कृत आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानणारा पक्ष आहे. महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे. संविधानाला मानणारा, लोकशाहीचे रक्षण करणारा, लोकांचे अधिकार टिकवून ठेवणारा आणि विकासाचा ध्यास घेतलेला हा पक्ष आहे.
जागे होऊया, देशाचे भविष्य उज्ज्वल करूया
सध्याच्या सरकारने ४०० रुपयांचा सिलेंडर १२०० रुपयांवर नेला, ६० रुपयांचे पेट्रोल १२० रुपयांवर नेले. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याऐवजी २ कोटी बेरोजगार निर्माण केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी उत्पादन खर्च दुप्पट केला. शेतकऱ्यांना हक्काचा हमीभाव न देता २ हजार रुपयांवर बोळवण केली जात आहे. ही व्यवस्था बदलायची आहे. तेव्हा सर्वांनी जागे होवून काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहावे आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार श्री. धिरज देशमुख यांनी केले.
आपल्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू
माजी आमदार श्री. त्र्यंबक भिसे म्हणाले, केंद्र सरकार समाजात, जाती-जातीत द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. देशात दडपशाही सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक होऊन लोकसभेला कॉंग्रेसचा उमेदवार निवडून द्यावा. माजी आमदार वैजनाथ शिंदे म्हणाले, राज्याचा, लातूर जिल्ह्याच्या विकास काँग्रेसने केला आहे. त्यामुळे अहोरात्र धडपड करणाऱ्या आपल्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेवूया आणि सध्याचे लोकसभेचे चित्र बदलवू.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण जाधव, ट्वेन्टीवन शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक श्रीपती काकडे, सर्जेराव मोरे, जगदीश बावणे, सुनिल पडिले, धनंजय देशमुख, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, अनुप शेळके, रविंद्र काळे, दैवशाला राजमाने, मदन भिसे, ईश्वर चांडक, अनिल पाटील, गुरुनाथ गवळी, गणेश सोमवंशी सुरेश चव्हाण, प्रताप पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, राजकुमार पाटील, सुभाष घोडके, गणेश सोमासे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले व आभार मानले.