महिला या घरावर व समाजावर संस्कार करणारे केंद्र – संचालक दत्ता बारगिरे
जागतिक महिला दिन विजय स्पर्धा परीक्षा केंद्रात उत्साहात साजरा.
लातूर प्रतिनिधी दि.८ मार्च 2024.
प्रत्येक महिला ही समाजातील महत्वाची घटक आहे. ती कुटूंबात आई, बहिण, पत्नी, मूलगी अशी जबाबदारी पार पाडत असते महिला स्वतःकडे दुर्लक्ष करते पण कुटूंबाकडे ती अधीक लक्ष देते महिलांनी आपले व्यक्तीमत्व जपायला हवे. तसेच आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आवडीनिवडी छंदही जोपासावे. प्रत्येक महिला या घरावर व समाजावर संस्कार करणारे केंद्र आहे असे प्रतिपादन विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक दत्ता बारगीरे यांनी केले.

जागतीक महिला दिनानिमित्त आज शुक्रवार दि.८ मार्च रोजी सकाळी लातूर शहरातील दयानंद गेट परीसरातील विजय स्पर्धा परीक्षा केंद्रात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेतील कास्यंपदक विजेती स्नेहल दत्तात्रय भोसले व मान्यवरांनी पुष्पहार अपर्ण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेतील कास्यंपदक विजेती स्नेहल दत्तात्रय भोसले, ॲड. अवधुत लंगडे, दत्तात्रय भोसले, विदया भोसले, प्रा. सचीन टोंपे, ॲड. आप्पासाहेब पौळ, सौ. अर्चना बारगीरे, जया बारगीरे, साक्षी कांबळे, सरीता पौळ, माधवी पौळ, भाग्यश्री पौळ, नीता सोमवंशी, श्वेता इंगळे, आदीसह विजय स्पर्धा परीक्षा केंद्रातील विदयार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते.
विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक दत्ता बारगीरे म्हणाले की, महिला देखील पुरूषाच्या खांदयाला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी महीला असूनही त्यांच्या कारकीर्दीत भारताचे नाव जागतीक पटलावर पोहचवुन अनेक कणखर निर्णय घेतले. महीलांनीही अडीअडचणीवर मात करून स्वत:च्या पायावर उभे राहावे. चूल आणि मूल एवढयापुरतेच मर्यादीत न राहता त्यांनी उंच आकाशात भरारी मारावी असे सांगून त्यांनी सर्वांना जागतीक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रकाश वाकडे यांनी करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या कार्याची माहीती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कोकाटे यांनी केले तर शेवटी आभार काजल भोसले यांनी मानले.