पाटणा : राजद आणि काँग्रेसच्या सोबतच्या महागठबंधनमधून बाहेर पडून जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार पुन्हा एनडीएत गेले आणि नवव्यांदा मुख्यमंत्री बनले. नितीशकुमारांनी नवं सरकार स्थापन केल्यानंतर एक महिना झाल्यावरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नितीशकुमारांची लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीच्या मागणीला भाजपकडून रेड सिग्नल दाखवण्यात आला आहे. बिहारमधील जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राप्रमाणं बिहारमध्येही भाजप एनडीएतील मोठा भाऊ ठरणार असल्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्रात भाजप ४८ पैकी ३४ जागा लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांची २२ ची मागणी होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर १३ जागांची मागणी केली होती. आता प्रत्यक्ष जागावाटपात त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणेच बिहारमध्येही जदयूचे १६ खासदार असतानाही त्यांना कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत.

त्यापैकी भाजप २० ते २२ जागा लढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नितीशकुमार यांच्याकडे १२-१४ जागा जाणार अशी शक्यता आहे. लोकजनशक्ती पार्टीमध्ये दोन गट पडले आहेत त्यांना चार चार जागा मिळण्याची शक्यता आहे. पशुपती पारस आणि चिराग पासवान यांच्या पक्षांना ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत दोन गट पडले होते. पशुपती पारस आणि चिराग पासवान या दोन्ही गटांना समान जागा मिळणार की वेगवेगळ्या जागा मिळणार हे पाहावं लागेल.बिहारमधील एनडीएचे घटक पक्ष उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टी आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या जीतन राम मांझी यांच्या पक्षाला एक जागा मिळेल, अशी शक्यता आहे.भाजपनं आतापर्यंत १९५ लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत. मात्जागा वाटपाच्या चर्चा सुरु असताना नितीशकुमार आणि संजयकुमार झा सुट्टीवर असून ते यूकेला गेलेले आहेत. नितीशकुमार पुढील आठवड्यात भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत भारतात आल्यावर चर्चा करती, अशी माहिती आहे., बिहारमधील जागांवर उमेदवार जाहीर केले नाहीत. भाजपची दुसरी यादी कोणत्याही क्षणी येईल, अशी शक्यता आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएनं ३९ जागा मिळवल्या होत्या. त्यापैकी १७ जागांवर भाजपचा विजय झाला होता. जदयूनं १६, लोकजनशक्ती पार्टीला ६ जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसला एक जागा मिळाली होती. राजदला गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती.