शहर हरित करणाऱ्या ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या महिला सदस्यांचा सत्कार.
लातूर जिल्हा हरित करण्याकरिता मागील सतराशे त्रेचाळीस दिवसांपासून अखंड अविरतपणे ग्रीन लातूर वृक्ष टीम कार्य करत आहे. या टीम मध्ये पुरुषासोबतच महिलांचा सहभाग सक्रिय आहे. आज जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शहरांमध्ये झाडे लावून झाडांचे संगोपन करणे, झाडांना पाणी देणे, शहर सुशोभीकरण, शहर स्वच्छता, जनजागृती , प्रबोधन याकरिता पुढाकार घेणाऱ्या, दररोज तीन ते चार तास श्रमदान करणाऱया सर्व सक्रिय महिला सदस्यांचा आज ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे शॉल, पुष्पहार व बेल आणि शमी चे झाड देऊ सत्कार करण्यात आला. यावेळी एड. वैशाली यादव, माजी नगरसेविका श्वेता लोंढे, माजी नगरसेविका स्वाती घोरपडे, प्रा. मीनाक्षी बोंडगे, योगा शिक्षिका कल्पना कुलकर्णी, मनीषा कोकणे, दिपाली राजपूत, विदुला राजमाने, लक्ष्मीताई बटनपुरकर, पूजा पाटील, ओवी माने, राजलक्ष्मी लड्डा, तुळसा राठोड इत्यादी महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी आज सकाळी स्व. राजीव गांधी चौक ते जिल्हा क्रीडा संकुल पर्यंत च्या सर्व झाडांना महिला सदस्यांच्या हस्ते टँकरद्वारे पाणी देण्यात आलं. सोबतच नारायण नगर येथील महादेव मंदिरात आलेल्या भाविक भक्तांना महाशिवरात्रीनिमित्त बेल शमी व तुळस यांची २५१ झाडे वितरित करून झाडे लावा झाडे जगवा झाडांचे संगोपन करा हा संदेश देण्यात आला.

आजचा हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पद्माकर बागल, दयाराम सुडे, सिताराम कंजे, नागसेन कांबळे, महेश गेलडा, राहुल माने, प्रवीण भराटे, रवी तोंडारे, मच्छिंद्र चाटे, गणेश सुरवसे, अभिजीत चिललरगे, शुभम आवाड, बालाजी उमरदंड, आदित्य स्वामी यांनी परिश्रम घेतले.