• Wed. Apr 30th, 2025

भाजपकडून दोनदा निमंत्रण, पण अटी-शर्थी मानल्या तरच प्रस्तावाचा विचार, अबू आझमींचा गौप्यस्फोट

Byjantaadmin

Mar 8, 2024

जळगाव : भाजपाने त्यांच्यासोबत येण्याचे एकदा नव्हे दोनदा मला आमंत्रण दिले मात्र ते जेव्हा आमच्या अटी-शर्ती मान्य करतील तेव्हाच त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करता येईल, असा दावा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी केला आहे.अबू आझमी हे काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांची जळगावच्या अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. भाजपकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का? असा प्रश्नावर उत्तर देतानाअबू आझमी म्हणाले, एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे. मात्र, त्यांनी सर्वात आधी महात्मा गांधींबद्दल चुकीचे बोलणे, त्यांच्या खुन्याचे कौतुक करणे बंद करावे. त्यांच्या सरकारमध्ये एकही मंत्री मुस्लिम नाही, मुस्लिमांनाही त्यांचा हिस्सा मिळायला हवा. त्यांनाही आपला परिवार म्हणून माना. या अटी-शर्थी मानल्या तरच सोबत जाण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल, असे आझमी म्हणाले.

लोकसभा जागावाटपा संदर्भात आझमींनी सांगितले की, समाजवादी पार्टीसाठी सद्यस्थितीत राज्यातील वातावरण चांगले आहे. त्यादृष्टीने आम्ही लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहोत. आम्ही किमान दोन जागांची मागणी पक्षाकडे केली आहे. उत्तर पूर्व मुंबई, धुळे आणि मालेगाव या मतदारसंघात पक्षाची स्थिती चांगली आहे, असं ते म्हणाले. चांगला उमेदवार मिळाला तर नक्कीच त्या संदर्भातला विचार करू, असंही त्यांनी सांगितलं.अयोध्येमध्ये जे राम मंदिर बनले आहे ते संविधानाच्या विरुद्ध बनवले गेले आहे. मात्र ठरल्याप्रमाणे मुस्लिम समाज बांधवांनी कोर्टाचा निर्णय मान्य करून घेतला. राम मंदिरावरून काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मात्र मंदिर असेल, देव असेल, धर्म असेल अशा गोष्टी राजकारणात आणू नयेत. याच राम मंदिराला पुढे करून आता भाजप मतं मागणार आहे आणि हे बिलकुल चुकीचे आहे, असंही आझमी म्हणाले.मनोज जरांगे पाटील यांना मी सलाम करेन, की त्यांनी आरक्षणाच्या मागणीवरून सरकारला झुकवलं आणि एकदा नाही तर दोन-तीन वेळा झुकवलं. मोठा मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी जर ठरवलं तर आगामी निवडणुकीत मराठा समाजाचे मंत्री आमदार खासदार आहेत त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असंही अबू आझमी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *