कर्तव्य प्रथम ही भावना उराशी बाळगून काम करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने या महाराष्ट्राला मिळाला -शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने

लातुर:-दिनांक 4 मार्च 2024 रोजी औसा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेनेची घोडदौड शिवसेनेचा भगवा डौलाने ठेवायचा असेल तर निश्चित स्वरूपांना शिवसेनेची बांधणी सक्षम करणं अत्यंत गरजेचं आहे होळीच्या पक्षात मी काम करत आहे ती शिवसेना हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे म्हणजे तमाम शिवसैनिकांची ऊर्जा आहे कसल्याही संकट समयी धैर्याने समोर जाऊन परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आज या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून महिला असतील सुशिक्षित बेरोजगार असतील शेतकऱ्याला आधार देण्याचं काम असेल आरोग्याच्या बाबतीत तर नेहमीच अग्रेसर असणारे मुख्यमंत्री अहोरात्र मेहनत घेत आहेत यांची दखल घेऊन विविध सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज एक दोन एक दोन या नंबर मध्ये असतात हे घडलं असेल तर फक्त आणि फक्त जबरदस्त अशा मेहनतीमुळे घडलेल आहे आणि आम्ही तमाम पदाधिकाऱ्यांनी या सर्व योजना या सर्व बाबी सर्वसामान्यांच्या दारात पोहोचवून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे हे सिद्ध करावे लागेल तेव्हा महाराष्ट्रातील जनता निश्य स्वरूपान धनुष्यबाणाचे पूजन करून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतील आणि शिवसेना वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी या पुढच्या कालखंडामध्ये अहोरात्र मेहनत करून लवकरात लवकर औसा विधानसभेमध्ये प्रत्येक गावात शाखा प्रत्येक शाखेमध्ये शाखाप्रमुख शिवदूत बूथ प्रमुख महिला आघाडी युवा सेना मजबूत करून शिवसेना वाढीचे कार्य करावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केले जिल्हाप्रमुख माने यांच्या हस्ते उपतालुकाप्रमुख विभागप्रमुख उपशहर प्रमुख शहर संघटक अशा विविध पदाधिकाऱ्याच्या नियुक्ती करण्यात आल्या तसे नियुक्तीपत्र देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पनाताई बावगे ,राधिका पाटील युवती सेना जिल्हाप्रमुख, मीनाक्षीताई मुंदडा, लोहारे ताई, सौ संगीता ताई शेट्टी ताईऔसा तालुक्याचे तालुकाप्रमुख गणेश माडजे तानाजी सुरवसे माजी तालुकाप्रमुख ,बंडू कोदरे शहर प्रमुख औसा ,विष्णू साबदे माजी उपजिल्हाप्रमुख लातूर, बाबुराव शेळके, रोहित जाधव ,वाहतूक सेना प्रमुख लातूर अर्जुन नेलवाडे कासार शिरशी 68 गाव मंडळ प्रमुख, शैलेश बाजुळगे सचिन पवार ,गोविंद धानोरे बाळू कांबळे ,वेंकट पवार ज्ञानेश्वर कुंभार, युवराज जाधव सचिन महिंद्रे ज्ञानेश्वर बिराजदार ,दगडू कांबळे, तानाजी कांबळे, अविनाश जाधव, शिवाजी कुंभार गणेश चव्हाण दत्ता गायकवाड, विशाल माळी सचिन बेडझिर्गे ,विक्रम शिंदे, विठ्ठल लंगर ,असंख्य शिवसैनिक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.