अपंगांना साहित्याच्या वितरणासाठी मोजमाप शिबिराचे आयोजन: सुमारे १११ जणांना मिळणार फायदा.
निलंगा :- समग्र शिक्षा अभियान जि.प.लातूर,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड यांच्या संयुक्त विद्यमानाने गट साधन केंद्र पं.समिती निलंगा येथे ० ते १८ वयोगटातील दिव्यांग मुलांची अस्थिव्यंग,अंध कर्णबधिर व बहुविकलांग यांच्या साहित्य साधनासाठी मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले होते.

हे विद्यार्थी सामान्य शाळेत शिक्षण घेत असून शैक्षणिक सेवेसोबत अडथळा मुक्त शिक्षण देण्याची विशेष विद्यार्थ्यांना गरज भासते ते पुरविण्यासाठीच्या अनुषंगाने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी निलंगा गटातील ९६ विद्यार्थी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १५ विद्यार्थी उपस्थित होते.या शिबिरात जिल्हास्तरावरून तज्ञ डॉक्टरांची टीम तपासणी करण्यासाठी आली होती. यावेळी निलंगा गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष स्वामी,जिल्हा IED समन्वयक अंगद माहानुरे,सुनील राजुरे उपस्थित होते.दिव्यांगाच्या सुप्त गुंणांना वाव देण्यासाठी साहित्य साधनाची गरज असुन दिव्यांगाची कलेक्टर या पदापर्यंत घेतलेली झेप याबाबत सविस्तर मार्गदर्शन संतोष स्वामी यांनी पालक व विद्यार्थीना मार्गदर्शन केले.सदर शिबिरातून पात्र लाभार्थ्यांना व्हील चेअर,ट्रायसिकल, लोव्हीजनकिट,श्रवणयंत्र ई.साहित्य उपलब्ध होणार आहेत.
शिबिर यशस्वीतेसाठी निलंगा प.स.गटसाधन केंद्रातील विभाग प्रमुख हरी मेळकुंदे,धीरज पाटील,केंद्रस्तरावरील विशेष शिक्षक अजित कानडे,पंडित जाधव,शिवराज मद्दे,विश्वजित निकम,गोविंद वाकडे,सय्यद इलियास,गुणाजी सूर्यवंशी,समद मुल्ला व राम मोरे यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन गोविंद वाकडे यांनी तर आभार विभाग प्रमुख हरी मेळकुंदे यांनी केले.