गुजरात विजयाचा निलंग्यात फटाके फोडून जल्लोष
छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन व घोषणाबाजी
निलंगा(प्रतिनिधी):-गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने १८२ जागेपैकी १५६ जागेवर दणदणीत विजय मिळविला असून विधान सभेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.गुजरात राज्यात सलग विजय मिळवत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंञी अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला असून भाजपा हा मोठा पक्ष ठरला आहे.पुन्हा एकदा भाजपाचा मुख्यमंत्री गुजरात येथे होणार आहे.या विजयाचा मोठा जल्लोष करत भारतीय जनता पार्टी निलंग्याच्या वतीने शहरातील छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून घोषणाबाजी करण्यात आली व चौकात फटाके वाजवून जल्लोष केला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे,शहरध्यक्ष विरभद्र स्वामी,माजी उपनरध्यक्ष मनोज कोळ्ळे,डॉ किरण बाहेती,विष्णू ढेरे,सुमित इनानी,भाजपा युवा शहरध्यक्ष तम्मा माडीबोने,अप्पाराव सोळुंके,अर्जून पौळ,प्रकाश पाटील,मंगेश गाडीवान,प्रदिप पाटील,सौरभ नाईक,निलेश अट्टल,सचिन गायकवाड,शफीक सौदागर,रवि कांबळे,धम्मा निंबाळकर अदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.