लातूर जिल्हा पेन्शनर्स असो.च्या वतीने लातुरात
३१ डिसेंबर रोजी वार्षिक पेन्शन डे चे आयोजन
लातूर : लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने लातुरात ३१ डिसेंबर रोजी वार्षिक पेन्शन डे चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास लातूर शहर व जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आवर्जून उपस्थित रहावे , असे आवाहन संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन मागच्या अनेक वर्षांपासून पेन्शन धारकांच्या समस्या अत्यंत तळमळीने सोडविण्याचे काम करत आहे. जिल्हाभरातील पेन्शनर्सच्या प्रश्नांची, अडी – अडचणींची सोडवणूक करण्यासाठी ही संघटना कायम प्रयत्नरत असते. बंद झालेली पेन्शन चालू करून देणे, पेन्शन धारकांची राहिलेली बाकी मिळवून देणे,पेन्शनर मयत झाल्यानंतर त्यांच्या पश्चात वारसांना पेन्शन मिळवून देणे,वयोमानपरत्वे पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळवून देणे यासारख्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ही संघटना तत्पर असते. पेन्शनर्स असोसिएशनच्या या कमला अधिक गती देण्यासाठी जिल्हाभरातील सर्व पेन्शनर्सनी या असोसिएशनचे सभासद होणे गरजेचे आहे. असो.च्या आजीवन सभासदत्वासाठी नाममात्र पाचशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. संबंधितांनी ही रक्कम असोसिएशनच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खा. क्रं . २००५०३५१५९६ IFSC Code MAHB0000038 या खात्यावर किंवा ऑनलाईन सुद्धा भरणा करता येऊ शकते.
संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कोरे गार्डन, मोती नगर याठिकाणी वार्षिक पेन्शन दे चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त पेन्शनर्सनी सहभागी व्हावे असे आवाहन असो.चे अध्यक्ष अण्णाराव भुसने, उपाध्यक्ष अशोकराव कुलकर्णी, शिवराज पोस्ते , कोषाध्यक्ष अशोकराव चाकूरकर, सचिव के.एस. मानकर , सहसचिव के.एस. पोपडे, एम.जी. मरळे, बी.बी. स्वामी, पटेल आदिंनी केले आहे.