• Tue. Apr 29th, 2025

कन्या श्रीजयाचे राजकीय करिअर घडविण्यासाठी अशोक चव्हाण यांचा खटाटोप?

Byjantaadmin

Mar 4, 2024

अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाने जणूकाही त्यांच्याकडे नांदेडची सुभेदारीच दिली आहे. संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्यासाठी चव्हाण सध्या जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. काँग्रेसमधील आपल्या समर्थकांचे प्रवेश सोहळे घेत त्यांनी भाजप नेतृत्वाला भूरळ घातली आहे. पण हे सगळं भाजप वाढवण्यासाठी की मग? स्वतःचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी? असा प्रश्न निश्चितच पडतो.

Ashok Chavan) यांनी आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघावर सध्या आपले सगळे लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थात चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली असली तरी आता त्यांना कन्या श्रीजया हिचे राजकीय करिअर घडवायचे आहे. लोकांची इच्छा असेल तर आपण (Bhokar) मतदारसंघातून निवडणूक लढवायला तयार आहोत, असे श्रीजया यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे त्यांची राजकारणात येण्याची इच्छा आता लपून राहिलेली नाही.

चव्हाण यांनी यापूर्वी त्यांच्या राजकीय प्रवेशाला हिरवा कंदील दाखवलेला आहे. (BJP) प्रवेशानंतर चव्हाण यांनी हा मतदारसंघ नव्याने बांधणीसाठी हाती घेतला आहे. त्यांच्यासोबत आलेल्या काँग्रेसमधील समर्थक आणि भाजपच्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मुलगी श्रीजया हिला मतदारसंघातून निवडून आणण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

(Congress) मधून भाजपमध्ये येणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. पक्षातील जुन्या व नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत समन्वय रहावा, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका, मेळावे घेतले जात आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केले. त्यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनीही 2015 – 19 या काळात प्रतिनिधित्व केले आहे‌.

चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील श्रीजया चव्हाण यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. लोकांची इच्छा असेल तर निवडणूक लढवणार, असल्याचे काही दिवसांपूर्वी श्रीजया चव्हाण यांनी सुतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये परतलेल्या चव्हाण यांनी सर्वप्रथम भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला. तरीही काही प्रमाणात स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये दुरावा आहे.दुरावा दूर होऊन समन्वय रहावा, यासाठी आता चव्हाण यांचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी लोकसभा व त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी, व्हावी यासाठी चव्हाण यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत अशोक चव्हाण 98 हजाराच्या मताधिक्याने भोकरमधून निवडून आले होते.

राज्यसभेवर जाण्यापूर्वी चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. भोकर विधानसभा मतदारसंघावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी आणि मुलगी श्रीजया हीचे राजकीय करिअर घडवण्यासाठी अशोक चव्हाण आतापासूनच तयारीला लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed