• Tue. Apr 29th, 2025

भाजप नेत्यांच्या बायो मध्ये अचानक ‘मोदी का परिवार’ !

Byjantaadmin

Mar 4, 2024

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा एखादा नारा, आरोप हे दूसऱ्या पक्षाच्या अचानक हिताचे ठरते. राजकारणात असे अनेकदा झाले आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ असा नारा दिला होता. त्यानंतर ‘मै चौकीदार हू’ अशी मोहिम भाजप ने राबविली होती. अगदी तशीच चुक 2024 च्या निवडणुकीपुर्वी लालुप्रसाद यादव यांनी केली. त्यांनी मोदीच्या परिवारावर वैयक्तिक टिका टिप्पणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला प्रत्युत्तर ‘माझ्यासाठी संपुर्ण देश परिवार’ आहे असे ठामपणे सांगितले. पंतप्रधानाने संपुर्ण देशाला परिवाराचा भाग संबोधल्यानंतर भाजप च्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘मोदी का परिवार’ ही मोहिम राबविणे सुरु केले आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी आणि ते मोदी परिवाराचा हिस्सा आहे हे दाखविण्यासाठी आज मिडिया हँडल ‘एक्स’ वर ‘मोदी का परिवार’ असा बदल बायो मध्ये केला आहे. यात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, अमित शाह, जेपी नड्डा, पियुष गोयल यांच्यासह राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर आदींनी त्यांचे बायो बदलले आहे. शनिवारी लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर त्यांच्या कुटुंबाबाबत वैयक्तिक टिका – टिप्पणी केली होती. आज पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण देश त्यांचे कुटुंब आहे. त्यानंतर आज भाजपच्या नेत्यांनी त्यांचे मिडिया हँडल ‘एक्स’ वर त्यांच्या नावासमोर मोदी का परिवार हे वाक्य जोडत लालुप्रसाद यादव यांना चांगलीच चपराक लगावली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी घराणेशाहीचा नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाने शनिवारी पाटणा येथील गांधी मैदानावर जनविश्वास रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत इंडिया आघाडीच्या रॅलीत अनेक बडे नेते सहभागी झाले होते. बिहार मधील जनतेला संबोधित करताना लालू यादव यांनी नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका केली आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत लालू यादव म्हणाले होते, “नरेंद्र मोदी आजकाल घराणेशाहीवर बोलत आहेत. तुमचे कुटुंब नाही. तुम्ही हिंदू ही नाही.” पाटणा येथील सभेला संबोधित करताना लालुप्रसाद यादव पुढे म्हणाले “कोण मोदी ? 2024 मध्ये ते (मोदी सरकार) उलथून टाकतील,” असा दावा त्यांनी केला.

लालूप्रसाद यादव यांच्या या विधानावरPM MODI आज जोरदार प्रहार केला. तेलंगणातील आदिलाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, “माझ्या कुटुंबामुळे मला लक्ष्य करण्यात आले. पण आता संपूर्ण देश म्हणत आहे की मी मोदींचे कुटुंब, परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर BJP नेत्यांनी सोशल मीडिया हँडलवरील बायो बदलला आहे. अमित शहा, पियुष गोयल, नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील भाजप नेते FADNAVIS चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर आदींनी ‘एक्स’ या मिडिया हँडलवरुन त्यांचे बायो बदलले आहेत.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी भ्रष्टाचार, घराणेशाहीत इंडिया आघाडीचे नेते आकंठ बुडाले असून ते अस्वस्थ झाले आहेत. आता विरोधकांनी 2024 च्या LOKSABHA साठी त्यांचा खरा अजेंडा समोर केला आहे. जेव्हा मी त्यांच्या घराणेशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तेव्हा हे लोक मोदींना कुटुंब नाही असे म्हणत फिरत असल्याचे मोदी म्हणाले. उद्या ते असेही म्हणू शकतील की तुम्हाला कधीही तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही, त्यामुळे तुम्ही राजकारणात येऊ शकत नाही. असे नवे उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देत थेट चारा घोटाळ्यातील आरोपी लालुप्रसाद यादव यांना लक्ष केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed