काँग्रेस ही एक चळवळ आणि विचार आहे, त्यामुळे कोणी पक्षातून बाहेर पडले, तर फार फरक पडत नाही. उलट नव्या नेतृत्वाला काम करण्याची संधी मिळते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर त्यांचे नाव न घेता सूचक वक्तव्य केले आहे.बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस (Congress) पक्ष सोडून जाणाऱ्यांची चिंता नाही. मुळात काँग्रेस ही एक चळवळ आहे आणि ती या देशाला हवी आहे. कोणी पक्ष सोडून गेलेच तर नव्या नेतृत्वाला काम करायला संधी मिळते. नवे नेतृत्व तयार होते, असेही सूचक विधान त्यांनी केले.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भारतीय जनता पक्षातप्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने हे मोठे ऑपरेशन केले,ला मोठा झटका बसला. असे चित्र असताना थोरात यांनी चव्हाण यांच्या पक्ष सोडण्यावर फारसे गांभीर्याने घेतलेले नाही, असा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असे THORAT यांनी सांगितले.थोरात म्हणाले, आम्ही पक्ष तळागाळात नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी अतिशय ताकदीने पुढे जाणार आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात केलेल्या खेळीने त्यांना लाभ होण्याऐवजी हानी होणार आहे. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना ही भावना बोलून दाखविली आहे. भाजप नेतृत्वालाही ही चिंता आता सतावू लागली आहे. मात्र वेळ निघून गेली आहे. जनता भाजपच्या या असंस्कृत राजकारणाला मतदानातून निश्चितच उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपात कोणत्याही समस्या नाहीत. लोकसभेचे जागावाटप ही एक मोठी प्रक्रिया असते. त्यात अनेक पक्ष असल्याने प्रत्येकाचे दावे प्रतिदावे असतातच. त्यात एकवाक्यता निर्माण करण्यास काही कालावधी जावा लागतो. महाराष्ट्रातील सर्व 48 जागांबाबत महाविकास आघाडीचे धोरण स्पष्ट आहे. त्यामुळे जागा वाटपात फारशा अडचणी येणार नाहीत. याबाबत आम्ही आशादायी आहोत, असेही त्यांनी सांगितले.
