• Tue. Apr 29th, 2025

राजमाता जिजामाता बी. एड. कॉलेजमध्ये राष्ट्रीय कार्यशाळा

Byjantaadmin

Mar 3, 2024

राजमाता जिजामाता बी. एड. कॉलेजमध्ये राष्ट्रीय कार्यशाळा
लातूर, दि.३- येथील राजमाता जिजामाता बी. एड. कॉलेजमध्ये ‘दिशा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्याचे प्राचार्य रघुनाथ मिसाळ यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप करंजीकर, अमरावतीचे डॉ. आर. एम. चव्हाण, बीडचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, धाराशिवच्या डॉ. शैलजा पैकेकर, तुळजापूरच्या डॉ. अर्चना कदम, प्रा. शालू मोले आदींनी यात सहभाग नोंदवला.
यावेळी प्राचार्य मिसाळ म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एमबीबीएस’चे शिक्षण हिंदी भाषेतूनही दिले जाणार आहे. जेईई व ‘नीट’मध्ये १३ भाषेतून ३० लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन धोरणात उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्टार एज्युकेशन स्कीम उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्जसुविधा व शैक्षणिक संस्थांना इमारत बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध देण्यात येणार आहे. कौशल्य विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. करंजीकर यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणाचे सूत्र सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य केंद्रे म्हणाले, १९८६ नंतर तब्बल ३४ वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण येत असून हे धोरण पुढील वीस वर्षे चालणारे आहे. या नवीन धोरणाची माहिती व तरतुदी शिक्षकांना माहित असणे गरजेचे असून शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे. प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी काम करतो. यासाठी कृतीपत्रिकेचा वापर करावा. पाठ्यपुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून वापरावेत. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकाचा वापर करून नवीन ज्ञान विद्यार्थ्यांना सांगणे गरजेचे आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. वैशाली केंद्रे, समन्वयक प्रा. अश्‍विनी केंद्रे, उपप्राचार्या कविता केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्राचार्य गणपत मुंडे, प्रा. आर. व्ही. जायेभाये, राजीव मुंढे, प्रा. नभा लहाने, प्रा. डॉ. एन. के. सय्यद, प्रा. सुशील कोरे, प्रा. राजेंद्र खुणे, डॉ. अनामिका कावरे, प्रा. हंसराज पडवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अरुण करदुरे यांनी केले तर आभार पांडुरंग कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed