लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांचा अश्वगंधा लागवड योजनेस चांगला प्रतिसाद सहभागी होण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी
ट्वेन्टीवन ॲग्री ली. शी संपर्क साधावा-संचालीका सौ. अदिती अमित देशमुख
लातुर:-ट्वेन्टीवन ॲग्रीच्या ली., च्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या अश्वगंधा लागवड योजनेस लातूर जिल्हयातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात अश्वगंधा लागवड सुरू झाली आहे. अश्वगंधा लागवड करण्यासाठी आणखी काही शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घ्यायचा असेल तर ट्वेन्टीवन ॲग्री ली. च्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे.
लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी सुगंधी व औषधी वनस्पती लागवडीस चालना देण्यासाठी ५०० एकर क्षेत्रावर अश्वगंधा लागवडीचे उदिष्टये ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. सदय परिस्थितीत या औषधी वनस्पतींना महत्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांना देखील यातून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी योजनेत सहभागी शेतकऱ्यांना अश्वगंधा शेतीत चांगले उत्पन्न झाले. ट्वेन्टीवन ॲग्री ली.मूळे शेतकऱ्यांचा अश्वगंधा वनस्पती लागवड करण्याकडे कल वाढला आहे. लातूर तालुक्यात यशस्वी झलेली ही योजना यावर्षी पासून जिल्हाभरात राबवली जात आहे. लातूर जिल्हयातील जवळपास सर्वच तालुक्यातील शेतकरी ट्वेन्टीवन ॲग्रीकडून मदत, मागदर्शन घेऊन अश्वगंधा लागवड करीत आहेत.
यावर्षी लातूर जिल्ह्यामध्ये 500 एकर क्षेत्रावर अश्वगंधा लागवडीचे उद्दिष्ट आहे. या हंगामातील लागवड सुरू झाली असून आणखी ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची इच्छा आहे त्यांनी ट्वेन्टीवन ॲग्री ली., पीव्हीआर टॉकीजच्या समोर, लातूर येथील कार्यालयात किंवा धनंजय राऊत 9260000083, दत्ता वाघमारे 9604300021 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे.