• Wed. Apr 30th, 2025

देशातील बांबू फर्निचर उद्योगाला लोदगा आकर्षणाचे केंद्र – पाशा पटेल  

Byjantaadmin

Dec 9, 2022

देशातील बांबू फर्निचर उद्योगाला लोदगा आकर्षणाचे केंद्र – पाशा पटेल  

लातूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज संस्था हैदराबाद, या भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संस्थे मार्फत बांबू क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी  (एफ. पी. ओ.) च्या प्रतिनिधीसाठी आणि स्टेट रुलर लाईव्हलीहूड मिशन (एसआरएलएम) चे राज्याचे प्रमुख अधिकारी यांच्यासाठी 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर असा 5 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशातील 9 राज्यातील एफ. पी.ओ. च्या 20 प्रतिनिधींनी भाग घेतला होता. यामध्ये मेघालय, त्रिपुरा, आसाम, तामिळनाडू ,केरळ ,आंध्र प्रदेश आणि तेलंगणा इत्यादी राज्यातील प्रतिनिधींचा समावेश होता. या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून या प्रशिक्षणार्थीना दि. ०७/१२/२०२२  रोजी लोदगा तालुका औसा जिल्हा लातूर येथील फिनिक्स फाउंडेशनच्या बांबू केंद्रास भेट व त्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भेटीदरम्यान फिनिक्स फाउंडेशनच्या मार्फत त्यांना बांबूच्या विविध उपयोग आणि त्यात झालेले जगभराचे काम याविषयी माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.

 सुरुवातीला संस्थचे अध्यक्ष  पाशा पटेल यांनी बांबू क्षेत्रात ते करत असलेले काम आणि बांबू चे महत्व समजून सांगितले. त्यानंतर संजीव करपे (आंतरराष्ट्रीय बांबू तज्ञ) यांनी प्रेझेंटेशन द्वारे  बांबुपासुन जगभरात होणारे विविध प्रयोग आणि बांबु पासुन बनणाऱ्या  विविध वस्तु या विषयीची माहिती दिली. त्यानंतर या प्रशिक्षणार्थीनी बांबु फर्निचर च्या कारखाण्यात भेट देऊन सविस्तर  माहिती समजुन घेतली. मेघालय, आसाम, त्रिपुरा सारख्या बांबु बहुल राज्यातून  प्रतिनिधीनी लातुर जिल्हातील लोदगा येथे प्रशिक्षण घेण्यासाठी फिनिक्स फाउंडेशनच्या बांबु केद्रामध्ये येणे हा आमच्या लातुर जिल्ह्यासाठी व मराठवाड्यासाठी बहुमान असल्याचे जेष्ठ शेतकरी नेते पाशा पटेल यांनी म्हटले. मागच्या महिन्यात मेघालय या राज्यातील 30 बांबू शेतकरी आणि बांबू कारागीर लोदगा येथील बांबू फर्निचर कारखान्याला भेट देऊन प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले होते. लोदगा येथील बांबू फर्निचर कारखाना आता भारत देशातील एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज संस्था हैदराबाद चे सहयोगी प्राध्यापक श्री सुरजित विक्रमन हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed