व्हि.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी लातुर महाविद्यालयाची “औद्योगिक क्षेत्र भेट” अंतर्गत Unichem Laboratoties Goa प्लांटला भेट
लातुर प्रतिनिधी- लातूरच्या नामांकित व्हि.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने
बी.फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांकरिता नुकतेच औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
औद्योगिक क्षेत्र भेट अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोवायेथील औद्योगिक वसाहतीमधील औषध उत्पादनात अग्रणी असलेल्या “Unichem Laboratoties, Goa” नामक औषध निर्माण कंपनीला भेट दिली.या औद्योगिक भेटीत विद्यार्थ्यांनी कंपनीच्या उत्पादन, गुणवत्ता, चाचणी, संशोधन व विकास, पॅकेजिंग आदी विभागाना प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध तंत्रज्ञान आणि कार्यप्रणालीची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील कंपन्या मध्ये असलेल्या तंत्रज्ञानाची व कार्यप्रणालीची माहिती व्हावी या उद्देशाने महाविद्यालयाकडून दरवर्षी आशा प्रकारच्या औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्राचार्य डॉ.बी.एस.वाकुरे यावेळी म्हणाले. या औद्योगिक भेटीच्या आयोजनासाठी “Unichem Laboratoties, Goa” येथील सर्व अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभले तर आयोजनासाठी व्हि.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ.बी.एस.वाकुरे, प्रा.व्ही.बी.काळे, प्रा.एस.एस.बडे, पल्लवी मोरे, सचिन शिंदे, रमाकांत सुर्यवंशी यांनी संयोजन केले.
