ग्रामीण भागातून येणाऱ्या परीक्षार्थींची गैरसोय दूर करा-शिवसेना
निलंगा:-निलंगा आगाराची बस प्रत्येक थांबा वरती थांबत नसल्याने परीक्षाचा काळ सुरू असून परीक्षार्थींना मुला मुलींना मोठी गैरसोय होत असल्याने प्रत्येक बस थांबा वरती बस थांबली पाहिजे सोबत निलंगा बसस्थानक महिला मुलींचे छेड छाड प्रकार दिवस दिवस वढत आहेत ते त्वरित थांबावे निलंगा बसस्थानक येथे पाणपोई ची सुविधा उपलब्ध करावी महिला साठी मोफ़त शौचालय सुविधा करावी प्रत्येक बस मध्ये अपंग व दिवांग्य व्यक्ती साठी आरक्षित जागा उपलब्ध करावी या सह अन्य मागण्या चे निवेदन आगार प्रमुख शिवसेना ठाकरे गटा तर्फे देण्यात आले आहे या निवेदनावर जयश्री ताई उटगे- जिल्हा महिला संघटिका – अविनाश रेशमे – तालुका प्रमुख-निलंगा – रेखाताई पुजारी तालुका महिला संघटिका -दैवता ताई सागर शहर महिला संघटिका दीपक रावसाहेब बिजराजदार – सलीम पटेल – अल्पसंख्याक तालुका प्रमुख, औसा सुधाकर मुगळे -मंगल ताई कांबळे. पार्वती ताई कांबळे गफ़र भाई लालटेकडे सुनील नायकवाड़े – शहरप्रमुख अर्चना ढाले,नागीन सुरवसे मेराज शेख. प्रशांत वाजवड़े-युवासेना तालुका प्रमुख आदींच्या साक्षऱ्या आहेत.
