तत्कालीन वैदयकीय शिक्षण मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांच्या धोरणावर शिक्कामोर्तब
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविदयालयात १०० विदयार्थी क्षमतेचे परीचर्या महाविदयालय मंजूर
प्रतिनिधी : तत्कालीन वैदयकीय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी निश्चीत केलेल्या धोरणानुसार विदयमान वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वैदयकीय महाविदयालयाच्या ठिकाणी शासकीय परीचर्या पदवी महाविदयालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यात लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविदयालय व सर्वोपचार रुग्णालय येथे १०० विदयार्थी क्षमतेचे परीचर्या महाविदयालय सुरू करण्यास प्रशासकीय मंजूरी दिली आहे. कोरोना महामारीच्या काळात गंभीर रूग्णावर उपचार करण्याच्या कामी महाराष्ट्रातील सर्वच शासकीय वैदयकीय महाविदयालयानी महत्वाची भुमिकानिभावली होती. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हयाच्या ठिकाणी वैदयकीय महाविदयालय सुरू करावीत, अशी मागणी पूढे आली होती. सदरील परिस्थिती मागणी लक्षात घेऊन तत्कालीन वैदयकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा तिथे वैदयकीय महाविदयालय सुरू करण्याचा धारेणात्मक निर्णय घेतला होता. डॉक्टरांबरोबरच प्रशिक्षीत वैदयकीय कर्मचारी निर्माण करण्यासाठीही वैदयकीय महाविदयालयाच्या ठिकाणी परीचर्या महाविदयालय व इतर वैदयकीय शिक्षणाची महाविदयालये सूरू करण्याचा सदरील धोरणात समावेश करण्यात आलेला होता.
सदरील धोरणानुसार विदयमान वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय वैदयकीय महाविदयालय व सलग्नीत रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णाची सुश्रुषा चांगल्या पध्दतीने व्हावी हा हेतू ठेऊन लातूरसह जळगाव, बारामती, सांगली, मिरज. कोल्हापूर, नंदूरबार व गोदिया येथील शासकीय वैदयकीय महाविदयालयात प्रत्येकी १०० विदयार्थी क्षमतेचे शासकीय परीचर्या पदवी महाविदयालय (बीएससी नर्सीग) स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी पहिल्या चार वर्षा करीता २०६.८५ कोटी रू. निधीची तरतूद केली आहे. लातूर येथे महाविदयालयाची इमारत बांधून तयार लातूर येथे वैदयकीय महाविदयालय परीसरात परीचर्या महाविदयालय सुरू करण्यासाठी महाविदयालय व वसतीगृहाची इमारत बांधून तयार आहे. तत्कालीन वैदयकीय शिक्षण मंत्री सदरील महाविदयालय सुरू करण्यासाठी तेव्हाच इमारत व इतर सोयीसुवीधा उपलब्ध करून ठेवल्या आहेत. शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता आगामी वर्षात या महाविदयालयात प्रवेश सुरू होतील अशी अपेक्षा आहे.
वैदयकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी मानले आभार

राज्यातील जनतेचे हीत आणि वैदयकीय महाविदयालयांची गरज ओळखून आपण आखलेल्या धोरणात कोण्ताही बदल न करता लातूरसह राज्यातील शासकीय वैदयकीय महाविदयलय ठिकाणी ७ परीचर्या पदवी महाविदयाये सुरू करण्यासाठी प्रशासकीय निर्णय घेतल्या बददल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विदयमान वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले आहेत.