महाराष्ट्र महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
निलंगा- ‘आरोग्य धनसंपदा’ या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालय सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. आज महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालय, निलंगा यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबीराअंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. डी. माने यांनी विद्यार्थ्यांशी आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या, विशेषतः महिलांमधील वेगवेगळ्या आरोग्याच्या अडचणीची विस्ताराने चर्चा करून जागरूकता निर्माण केली. या शिबिरात रक्तगट, रक्तश्रेणी, मधुमेह, एचआयव्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरांतर्गत एकूण १५० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आणि त्या अंतर्गत ५० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक हुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. डी. माने, सिंधु जाधव, नितीन कांबळे , संध्या लोंढे, अश्विनी महाजन , ज्योती इंगळे टीम उपस्थित होती. या शिबीरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ. शेषेराव देवनाळकर, प्रा. विष्णु रेड्डी, डॉ. मुल्ला मुस्तफा, डॉ. विजय कुलकर्णी प्रा.स्नेहा बोळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन आरोग्य धनसंपदा उपक्रमाचे समन्वयक डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. नरेश पिनमकर, डॉ. सुभाष बेंजलवार,प्रा. शिवरूद्र बदनाळे, प्रा. धनराज किवडे, डॉ. विठ्ठल सांडूर व राजु एखंडे यांनी परिश्रम घेतले.
