• Mon. Apr 28th, 2025

शरद पवारांचे विचार घेऊन रा.काँ. पार्टी बळकट करणार-संजय शेटे 

Byjantaadmin

Feb 27, 2024

शरद पवारांचे विचार घेऊन रा.काँ. पार्टी बळकट करणार….. संजय शेटे 

निलंगा:-  निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्ष संघटनेत योग्य ते स्थान देत 

शरदचंद्रजी पवार यांचे विचार जनसमान्यापर्यंत पोहोचवून  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष बळकट करणार असल्याचे प्रतिपादन नूतन जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी केले.

निलंगा येथे  आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष रशीदभाई शेख , डॉ बापूसाहेब पाटील उजेडकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य रघुनाथराव कुचेकर, महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई कदम, युवती जिल्हाध्यक्षा स्नेहाताई मोठे, प्रदेश सचिव महादेवीताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, भटक्या विमुक्त  संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष कतिकार विलास माने, इस्माईल लदाफ, लक्ष्मण कांबळे, ॲड मंगलताई पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना संजय शेटे म्हणाले,  देशाचे राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार वयाच्या 83 व्या वर्षात सुद्धा सामान्य माणसाच्या हक्कासाठी व पक्ष बदलू व दलबदलू राजकीय नेत्यांना घरी पाठवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार हे खोटारडे आहेत. कोणी पक्ष हिसकावला, कोणी चिन्ह हिसकावले तर कोणी बाप हिसकावतोय हे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्राला मान्य नाही. हे गलिच्छ राजकारण संपुष्टात आणण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून गावागावत, तालुक्यात, वस्ती तांड्यावर जावून शरदचंद्रजी पवार यांचे विचार जनसामान्यांत पेरण्यासाठी काम करत आहे..पदाधिकारी निवडताना  जात, पात, धर्म हे न पाहता शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांचा पाईक, एकनिष्ठ, जनतेत काम करणारा, पक्षासाठी झटणारा आणि आगामी निवडणुकीत विजयश्री खेचुन आणणारे , सर्व सामान्य माणसाच्या मनातल्या कार्यकर्त्यांस पदाधिकारी म्हणून  काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई कदम म्हणाल्या , महिलांना न्याय हक्क व   पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क मिळवून देण्याचा काम शरदचंद्रजी पवार यांनी केले आहे.आज महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आहे. यापूर्वी पक्षाच्या नावाने, शरद पवार साहेबांच्या कृपेने विविध पदे उपभोगलेले नेते आज गद्दारीचा टिळा लावून लाज लज्ज्या न बाळगता  मिरवत आहेत.  , इफरोज  शेख,अल्पसंख्याक शहर अध्यक्षा मुन्नाबी मोमीन,भटक्या विमुक्त संघटनेचे महाराष्ट्र सचिव विकास माने,आशाताई जाधव, निजाम शेख,प्रवीण कवटकर यांच्या सह हजारोंच्या संख्येने शरद पवार यांच्या प्रेम करणाऱ्या निष्ठावंत महिला, पुरुष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

यावेळी  भटक्या विमुक्त संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  वतीने मान्यवरांचे  स्वागत सत्कार करण्यात आले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed