रामतीर्थ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिले वार्षिक स्नेहसंमेलन साजरे
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील रामतीर्थ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिले वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे झाले.या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख तथा केंद्रिय मु.अ. बालाजी माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात माझ्या पपाणी गणपती आणला, फिर भी दिल है हिंदुस्तानी, दैवत छत्रपती, आई भवानी तुझ्या कृपेने, माऊली माऊली, येऊ कशी कशी मी नांदायला, खंडेराया झाली दैना, ये वतन ये वतन,जलवा जलवा यासह अनेक देशभक्तीपर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर, तसेच भक्ती गीत भावगीतावर विद्यार्थ्यांनी सुंदर ठेका धरला होता.लहान चिमुकल्यानी केलेल्या नृत्याचा मनमोहक पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जिल्हा परिषद शाळेच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षक तालुका अध्यक्ष प्रशांतजी इंगळे,नूतन निलंगा तालुका कार्याध्यक्ष प्रताप कावळे महाराज, नूतन पतसंस्था चेअरमन निलंगा आनंदजी जाधव , यांची जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हाध्यक्ष केंद्रे जगदीश यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित आजी माजी सरपंच रामतीर्थ यांचेही सहकार्य लाभल्या बदल सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिक्षक समिती लातूर जिल्हाध्यक्ष अरूणजी सोळुंके , कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे कास्ट्राईब संघटनेचे तालुका अध्यक्ष भिवाजी कांबळे ,कास्ट्राईब संघटनेचे तालुक अध्यक्ष भरत सूर्यवंशी ,दत्तात्रय बेद्रे यावेळी व्हाईस चेअरमन श्री सोनटक्के ,डी.पी. बिराजदार ,कोळगाव पुर्व चे मु.अ. दिपक कांबळे , मधुकर सुर्यवंशी , विजयकुमार मुंडे,ग्रामसेवक डी आर भोसले,सरपंच सौ.शिल्पा मनोज गवळे, शालेय समीतीचे अध्यक्ष बलभीम बाबळसुरे व केंद्रातील सर्व शिक्षक तसेच गावातील नागरीक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व गावकऱ्यांचे मु.अ.रणजित कांबळे व शिक्षक जगदीश केंद्रे यांनी आभार मानले.