गिता वाडकर हीची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
निलंगा:- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील कु. गीता वाडकर या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांनी परभणी येथे दिनांक ९ व १० मार्च २०२४ रोजी आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय ची विद्यार्थिनी कु. गीता माधव वाडकर या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे. याबद्दल व्यवस्थापन परिषद सदस्य मा. डी.एन. मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके ,डॉ.रोडे ,आणि विद्या परिषदेचे सदस्य डॉ. शिंदे ,डॉ. बी.एम. वाघमारे , प्रा.एस.जी.कुलकर्णी , डॉ. नरेश पिनमकर तसेच क्रीडा संचालक डॉ.गोपाळ मोघे यांच्या उपस्थितीत या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला .अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये या विद्यार्थिनीने जे यश मिळवले ते वाखाण्याजोगे आहे अशी भावना यावेळी डॉ.डी. एन. मोरे यांनी व्यक्त केली व विद्यापीठातील मुलींनी या विद्यार्थिनी कडून प्रेरणा घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर यांनीही या विद्यार्थिनीचे कौतुक केले आहे.