मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच सगेसोयऱ्यासह आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या आंदोलनाला काल जालना येथे हिंसक वळण लागले. विधिमंडळाच्या अधिवेशनात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा विषय गाजत असून,एसआयटी चौकशीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.यानंतर काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून सरकारचे सगळेच काही काढले.

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षणावर ठाम आहे.यातून पुन्हा आंदोलन सुरू केले. १७ दिवस बेमुदत उपोषण केले.आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागले आहे. याचे पडसाद अधिवेशनात आज उमटले. यावर बाळासाहेब थोरात चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मुंबईकडे येणारा मोर्चा नवी मुंबईत थांबल्यानंतर मध्यस्थी झाली आणि गुलाल उधळला गेला. मनोज जरांगेच्या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही.आता एसआयटी चौकशी लावली जात आहे. हे कळण्यापलीकडे आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. मनोज जरांगेंचे आंदोलन हे शांततेत सुरू होते.शांततेच्या मार्गाने मोर्चे निघत होत.लाखो लोक जमत होते.शांततेत उपोषण सुरू होते. जे उपोषण शांततेत सुरू होते, कोणालाही माहित नव्हते आणि त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. महिला आणि मुलांना मारहाण झाली. यातून गदारोळ झाला. अचानक आंदोलन प्रकाशझोतात आले. यानंतर मनोज जरांगेच्या सभा व्हायला सुरूवात झाली. लाखोंच्या सभा झाल्या. सरकार आणि जरांगे यांच्यात संवाद सुरू होता.
मुंबईकडे मोर्चा निघाल्यावर तो नवी मुंबई येथे थांबवण्यात आला. तिथे मध्यस्थी झाली. गुलाल उधाळला गेला, नंतर पुन्हा मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ का आली, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील या मुद्यावरून विधिमंडळात आक्रमक झाले.महाराष्ट्रात जे काही होत आहे,त्याची चौकशी झालीच पाहिजे,अशी मागणी केली.