शाश्वत पर्यावरण विकासाकरीता देशातील एरंडी उद्योजकानी एकत्र येणे ही काळाची गरज –- पाशा पटेल
अहमदाबाद : दि. २२ व २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सॉल्व्हन्ट एक्सट्रेक्शन असोसिएशन द्वारा ग्लोबल कॅस्टर कॉन्फरन्स २०२४ चे गुजरात ची राजधानी अहमदाबाद येथील हॉटेल ताज येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी श्री पटेल यांनी आपल्या संबोधनाच्या माध्यमातून वातावरण बदलामुळे जगावर ओढवलेल्या भीषण संकटाची जाणीव करून देऊन मानव जातिचे रक्षण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात बांबूचे लागवड करून वातावरणात वाढलेले कार्बन कमी करणे अति आवश्यक असल्याचे सांगितले तसेच बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱयांना मोठ्या प्रमाणात उत्पनाचे साधन निर्माण होणार आहे. या करिता शाश्वत पर्यावरण विकासाच्या कार्यात एरंडी उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात सामील होण्याचे आवाहन पटेल यांनी केले.

या कार्यक्रमाकरिता गुजरात राज्याचे उद्योग मंत्री बलवंत सिंग राजपूत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते., या वेळी केंद्रिय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा, राज्यसभा खासदार बंसीलाल गुर्जर, सॉल्व्हन्ट असोसिएशन चे अध्यक्ष अजय झुनझुनवाला, अदानी ग्रुप चे अतुल चतुर्वेदी, सॉल्व्हन्ट असोसिएशन चे बी व्ही मेहता, हरेश व्यास, व देशातील आणि जगभरातील कॅस्टर {एरंडी} उद्योग जगतातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
