मराठा आरक्षणासाठी निलंग्यात रास्तारोको.
निलंगा प्रतिनिधी:-मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या मागणीनुसार सरकारकडून ‘सगेसोयरे’ कायदा पारित करून घेण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन सकाळीं 11:00am ते 1:00 pm या वेळेत करण्यात आले.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गेली अनेक दिवस झाले अंतरवाली येथे आमरण उपोषण सुरू केले आहे,सरकाने सगेसोयरे कायदा पारित करावा,मराठा आरक्षण संदर्भात हैद्राबाद गॅजेट,बॉम्बे गॅजेट,सातारा संस्थानचे गॅजेट लागू करावे व महाराष्ट्रभर मराठा आरक्षण संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट माघे घेण्यात यावे या मागणीसाठी ते आमरण उपोषण करत आहेत, सरकारने विशेष अधिवेशनात या सर्व मागण्या मान्य करू असा शब्द दिला होता तो शब्द सरकारने पाळला नाही अखंड मराठा समाजाचा सरकारने विश्वासघात केला असून लवकरचं मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे ह.भ.प. समाधान महाराज उमरगेकर यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीने सरकारचा निषेध केला.तसेच सकल मराठा समाज बांधव यांच्यातर्फे प्रमोद कदम यांनी अत्यंत शेलक्या शब्दात सरकारचा निषेध करत आरक्षणाचा सुरुवातीपासून चा इतिहास त्या ठिकाणी व्यक्त केला जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीं तोपर्यंत आम्हीं स्वस्थ बसणार नाही आश्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर समाजाच्या वतीने अजित माने यांनी सरकारमध्ये चाललेल्या चुकीच्या धोरणाचा निषेध करत आरक्षणाची मागणी केली.किरण पाटील यांनीही फसव्या सरकारचा निषेध करत आपले विचार व्यक्त केले. हरिभाऊ सगरे यांनी वारंवार सरकार फसवत आहे.असा उल्लेख करत त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला. राजाभाऊ साळुंखे,शंकर देशमुख, त्यांनीही या ठिकाणी विचार व्यक्त केले. तसेच हे रस्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी ईश्वर पाटील, किसनराव मोरे,विशाल जोळदापके,प्रदीप कदम, विनोद सोनवणे,धीरज शिंदे, परमेश्वर सोमवशी,बालाजी पाटील,संतोष घाडगे,महेश ढगे,ॲड तिरुपती शिंदे,अँड दत्तात्रय सोळुंके,मंगेश गाडीवान,माधव वाडीकर, बालाजी पाटील,भगवान जाधव,रितेश तांबोळी,धीरज नागरगोजे,गणेश गंगथडे, राजेश पवार, दत्ता जाधव, दत्ता ढाले,पापा उमट्वाडे,राजेश पवार, सचिन पवार, संतोष मोघे, लक्ष्मण सोळुंके असंख्य समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवून हा निषेध आंदोलन,रस्ता रोको यशस्वी केला.त्याचबरोबर मुस्लिम बांधवांच्या वतीनेही लाला पटेल बागवान,शकील बागवान,त्या ठिकाणी पाठिंबा देण्यात आला.