• Tue. Apr 29th, 2025

पक्ष फुटीनंतर एकमेकांवर जाहीर टीका अन् सडेतोड उत्तर, पाणीप्रश्नावर अजितदादा- रोहित पवारांची भेट

Byjantaadmin

Feb 24, 2024

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत कालवा समितीची बैठक पुण्यात पार पडत आहे. या बैठीकाला शरद पवार गटाचे नेते रोहित पवार, राजेश टोपे, सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजकीय पटलावर रोहित पवारांनी अजितदादांना धारेवर धरलं आहे. अजित पवार यांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देत असताना कालवा समिती बैठकीनिमित्त आज रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली आहे.उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये जाणवणाऱ्या पाणीटंचाई बाबत ही महत्वाची बैठक पार पडत आहे. यासाठी पुणे शहर व जिल्हाचे प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली आहे. या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार राजेश टोपे, आमदार शहाजी बाप्पू पाटील, आमदार रवींद्र धंगेकर आणि इतर नेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांच्यावर आपला पारा सोडला आहे. सातत्याने वयचा उल्लेख करत शरद पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न करताना अजित पवार दिसत आहेत. मात्र, याबाबत स्वत: शरद पवार तसेच सुप्रिया सुळेंकडून उत्तर न देण्याची भूमिका घेतली जात आहे. परंतू, शरद पवारांवरील टीकेनंतर रोहित पवार प्रचंड आक्रमक होताना दिसत आहेत. शरद पवार गटाच्या मंचर येथील सभेवेळी ‘वादा तोच दादा नवा’ अशा आशयाचे बॅनर देखील रोहित पवार समर्थकांनी लावले होते. त्यामुळे रोहित पवार थेट अजित पवारांना अंगावर घेत असल्याचे चित्र पवार कुटुंबात पाहायला मिळत आहे.आमदार रोहित पवार आजच्या भेटीबाबत म्हणाले की, माझ्या मतदारसंघात कुकडी प्रकल्पातील पाणी सोडावे ही मागणी अजित पवारांनी मान्य केली आहे. त्यासोबत उजनी धरणातील पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना सहापट पाणी पट्टी भरावी लागत आहे. तसचे इतर विविध पाण्याच्या प्रश्नवर माझा बोलणं झालं असं रोहित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed