लातुर:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) शिवाजीराव माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूड पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या नंतर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी महिला आघाडीची बैठक घेऊन सर्व महिलांना मार्गदर्शन केले व समस्या जाणून घेतल्या.

त्याच बरोबर शिवसेना मागासवर्गीय सेल आयोजित नंदी स्टॉप औसा रोड या ठिकाणी होत असलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पनाताई बावगे, युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख ॲड. राधिका पाटील,कामगार आघाडीचे जिल्हा आध्यक्ष मंगेश निकम, विष्णु साबदे, तालुकाप्रमुख सदाशिव गव्हाणे बाबुराव शेळके, शहर प्रमुख परवेज पठाण, शहर संघटक संदीप मामा जाधव, उपशहर प्रमुख श्रीहरी डोपे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब दंडीमे, महिला आघाडीच्या शहरप्रमुख मीनाक्षीताई मुंदडा, महिला आघाडीच्या शहरप्रमुख बबीता गायकवाड,वंदना गोरे उप शहरं प्रमुख, सौ संगीता शेटे उप शहरं प्रमुख, सौ विमल शेटे शाखा प्रमुख, सौ प्रेमलता लोहारे, लक्ष्मी ताई काकने शहरं संघटक, वंदना गोरे उपशहर प्रमुख, लक्ष्मी काकणे शहर संघटक, बालिका क्षीरसागर शहर संघटक, शोभा सूर्यवंशी विभागप्रमुख, मीरा लंगे शाखाप्रमुख,दैवशाला कांबळे शाखाप्रमुख. आधी शिवसैनिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .
