निलंग्यात ‘फायर पेंटिंग’मधून साकारली नयनरम्य शिवरायांची प्रतिमा
शिवज्योत व धर्म रक्षक ढोलताशा पथकाने वेधले जनतेचे लक्ष
निलंगा :- अक्का फाउंडेशन व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने निलंगा शहरा नजीक निलंगा उदगीर रोड शेजारी जगातील सर्वात मोठे फायर पेंटिंग तब्बल 4 लाख चौ , स्क्वेअर फुटात (दहा एकर) मध्ये एवढी भव्य दिव्य शिवप्रतिमा साकारण्यात आली होती. दि .18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ‘फायर पेंटिंग’ मधून साकारली भव्य दिव्य नयनरम्य छत्रपती शिवरायांची प्रतिमा तसेच शिवभक्तांनी शिवज्योत व दत्ता मोहळकर संचलित धर्म रक्षक ढोल ताशा पथकाने नियोजन बद्ध पध्दतीने ढोल ताशाचा गजर जनतेचे लक्ष्य वेधून घेतले.

मंगेश निपाणीकर व वैभव निपाणीकर या दोन बंधूंनी साकार केलेली छत्रपती शिवरायांची प्रतिमा. जगातील सर्वात मोठे ‘फायर आर्ट’ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. अशा भव्य दिव्य शिवज्योत उत्सवासाठी हजारोच्या संख्येने जनता उपस्थित होती . गेल्या 2018 पासून अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून शिवभक्तांच्या सहभागसह अतिशय उत्साहात शिवजन्मोत्सव निलंगा शहरात साजरा केला जातो. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:00 वाजता शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून शिवज्योत रॅलीची सुरुवात झाली या रॅलीत मुली मुले महिला शिवभक्तांनी मशाली घेऊन धर्म रक्षक ढोल ताशा पथकाच्या गजरात नृत्य सादर केले सायंकाळी7:00 वाजता निलंगा लांबोटा रोडवर शिवजन्मोत्सव समिती व अक्का फाउंडेशनच्या वतीने दहा एकर जमिनीवर साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन फायर पेंटिंग च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची फायर पेंटिंग मध्ये अलौकिक प्रतिमा साकारण्यात आली मोठ्या प्रमाणात आतिषबाजी साजरी करण्यात केली. या विश्वविक्रमी ‘फायर आर्ट’ चा नयनरम्य व ऐतिहासिक देखावा साकारला . या भव्य दिव्य कार्यक्रमाचे हाजारो शिवभक्त साक्षीदार झाले .

यापूर्वी आपण 2018 साली विश्वविक्रमी रांगोळी 2019 ला हरित जन्मोत्सव ,2020 शिव संकल्प दुष्काळ मुक्तीचा व व्यसनमुक्तीचा, 2021 साली सांस्कृतिक शिवजन्मोत्सव, 2022 साली शाश्वत शिवजयंती, 2023 मॉं वंदन जन्मोत्सव, असे अनेक कार्यक्रम सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून भव्य दिव्य ऐतिहासिक देखाव्याचे आयोजन करून व मिरवणूक अतिशय शांततेत शिस्तबद्ध व जोश पूर्ण वातावरणात हजारो माता भगिनींच्या सहभागासह निलंगा शहरात युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून साकारले आहे यापुढे जाऊन यावर्षी फायर पेंटिंग शिवज्योत शिवजन्मोत्सव साकार करण्यात आले
शिवरायांच्या जयंती निमित्त संभाजीरावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प
युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या कल्पनेतून समाजाला योग्य दिशा देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाजकारण, राजकारण करतो. दिल्लीला कार्यक्रम असताना आपल्या जन्मभूमीत छत्रपती शिवरायांच्या आपल्या हृदयातील राजाच्या या जयंतीसाठी वरिष्ठाची परवानगी घेऊन दिल्लीहून आलो. शिवाजी राजांनी अठरा पगड जाती धर्मांना घेऊन स्वराज्यातून सुराज्य निर्माण केली त्याच पद्धतीने समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून विकासाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य व त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करू या भागातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी , सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार आणि संकल्प छत्रपती शिवरायांच्या फायर पेंटिंग पूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोलून दाखवली.यावेळी मा. खासदार रूपाताई पाटील निलंगेकर आक्का ,डॉ समिधा अरविंद पाटील निलंगेकर, प्राजक्ता मारवा,आशिष मारवा,उपविभागीय अधिकारी शरद झाडके,उपविभागीय पोलिस अधिकारी, नितीन काटेकर, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सभापती शिवकुमार चिंचनसुरे, नरशिंग बिरादार ,उपसभापती, लालासाहेब देशमुख , चेअरमन दगडू सोळुंके,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे,माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी ,कुमोद लोभे,किशोर जाधव, आप्पाराव सोळुंके,सुमित इनानी,सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी केले,