विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
विलासनगर :– स्थापनेपासूनच साखर उद्योगात वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करून सर्व गळीत हंगाम यशस्वी करणारा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून मांजरा परिवाराचे मार्गदर्शक तथा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या दूरदृष्टी नियोजनातून सर्व ऊसाची तोडणी ही मशीन द्वारे केली गेली आहे.

मांजरा कारखान्याने १०५ दिवसात आपल्या गाळप क्षमतेचा पुर्ण वापर करून शेतक-यांचा ऊस तत्परतेने गाळप होण्यासाठी संबंधित यंत्रणेला योग्य त्या सुचना देवून पाच लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. यासोबतच कारखान्याने चालू गळीत हंगामात ४६४६५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे तर सरासरी साखर उतारा 10.51एवढा प्राप्त झाला आहे. विजनिर्मिती प्रकल्पातून १५९८२०००( के डब्ल्यू एच) एवढी वीज वितरीत केली आहे. यासोबतच ३९६००६०लीटर इथेनॉलची निर्मिती करून दैनंदिन गाळपात आघाडी घेतली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेला साखर कारखानदारीचा लातूर पॅटर्न माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आ.अमित विलासरावजी देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख पुढे घेऊन जात असून सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी काळाची गरज ओळखून सर्व ऊस मशीन द्वारे तोडण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन तो यशस्वी करून दाखवला या बद्दल देशभरातील साखर उद्योगात कौतुक केले जात असून अनेक कारखान्याचे संचालक व अधिकारी या नवीन पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी मांजरा कारखाना येथे भेट देण्यासाठी येत आहेत.विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना परिसरातील उर्वरित सर्व ऊस वेळेच्या आत गाळप करण्याचे नियोजन कारखान्याने केले आहे. त्यामुळे कोणीही यासंदर्भात काळजी करू नये असे कारखान्याच्या वतीने कळवण्यात आले आहे.