तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा–अनमोल सागर
· जिल्हा परिषदेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
लातूर दि. 19 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक, युद्धनीती, राजनीती निपुण असे आदर्श लोककल्याणकारी राजे होते. आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महारज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्राची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडे, उप शिक्षण अधिकारी श्री. पवार, प्रशासन अधिकारी श्री. बादणे, रामकिशन फड, संतोष माने यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शाहिर धम्मपाल सांवत व संच यांनी पोवाडा आणि शिवगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवादतज्ज्ञ उध्दव फड यांनी केले.
*****
लातूर महसूल उपविभागीय व तहसील कार्यालयाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी
लातूर दि. 19 (जिमाका): लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि लातूर तहसील कार्यालयामार्फत विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या उपक्रमांना सुरुवात झाली.

उपविभागीय कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार गणेश सरोदे, सुधीर देशमुख, भीमाशंकर बेरुळे, श्रीमती एस. एस. माडजे, मंडळ अधिकारी महेश हिप्परगे यावेळी उपस्थित होते.
यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात देशिकेंद्र विद्यालयाच्या चमूने महाराष्ट्र गीत सादर केले. यामध्ये संगीत शिक्षक गणेश शेषराव सुतार यांच्यासह आरोही कदम, ऋतू वाघमारे, राघवी वाडकर, साक्षी वाघमारे, आदिती जाधव या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यानंतर रेणुका नेताजी पुरी (जाधव) यांची कन्या कुमारी खुशी हिने शिवगर्जना सादर केली. तलाठी सत्यंनारायण आचार्य यांनी ‘एकच राजा इथे जन्मला’ हे शिवगीत गायले. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून विद्यवान साळुंके यांचे चिरंजीव अदिनाथ विद्यवान साळुंके यांनी शिवचरित्र सादर केले. तसेच तलाठी वैशाली शंकर सुर्यवंशी (लासुरे) यांनी जिजाऊच्याज वेशभुषेमध्ये एकपात्री नाटकातून शिवरायांची महती सांगितली.
तलाठी सोमनाथ एकलिंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवनपट सादर केला. या कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींनी विविध वेशभूषेत सहभागी होत रंगत आणली. यामध्ये ओमप्रकाश म्हेशकरे यांची कन्या मनवा राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत, तलाठी रमेश गोरे यांचा मुलगा प्रतिक यांने मावळा, अव्वल कारकून विद्यवान साळुंके यांचे चिरंजीव अदिनाथ यांनी बालशिवबा व पार्थ यांनी मावळ्याची वेशभूषा केली होती. अव्वल कारकून गणेश एकडे यांचे चिरंजीव विराज यांनी बालशिवबाची वेशभुषा केली. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका पुरी व सोमनाथ एकलिंगे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची गडावरील प्रतिमेची सुबक व आकर्षक रांगोळी तलाठी वैशाली सूर्यवंशी यांनी रेखाटली. त्यांना स्मिता आळंगे, शितल वंगवाड, प्रिती सावंत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी तलाठी सदानंद सागावे, रामराव झाडे यांनी परिश्रम घेतले. सहभागी कलाकार आणि त्यांच्या पालकांचे उपविभागीय अधिकारी श्रीमती नऱ्हे-विरोळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, शिपाई, कोतवाल विविध संवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. सुनिल लाडके, नागनाथ खंदाडे, अभिषक्ता बिराजदार, विलास कतलाकुटे, महंमदरफी मुजावर, नारायण शिंदे, रवी वावरे, अविनाश साठे, सुनंदा राठोड, श्रीमती सुप्रिया बिराजदार, मिनाक्षी कलबुर्गे, मारुती आडे, अमित जगताप, शैलेश साळुंके, अंबादास यामजले, कृष्णा जटाळ, अरिफ शेख, अजिमोद्दीन शेख, प्रिती सावंत, आकाश जगदाळे उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.