छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
लातूर दि. 19 (जिमाका): शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
*****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात चिमुकल्या शाहिरांनी सादर केला पोवाडा
· जिल्हाधिकाऱ्यांनी केले बाल शाहिरांचे कौतुक
लातूर दि. 19 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी चिमुकल्या शाहिरांनी पोवाडे, शिवगीते सादर केली.
अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, सामान्य प्रशासनचे तहसीलदार डी. एन. शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी स्वरा गजानन मुळे या मुलीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती देणारे भाषण केले. बालशाहीर मृणाली विलास यादव आणि अवधूत विलास यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. अतिशय प्रभावी सादरीकरण आणि आशयपूर्वक मांडणीने उपस्थितांची मने जिंकली. पोवाडा सादरीकरणानंतर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दोन्ही बाल शाहिरांचे कौतुक करून यापुढेही असेच प्रभावी सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सूर्यवंशी यांनी केले.