• Tue. Apr 29th, 2025

जुळ्या बहिणींचे एकाच मुलाशी लग्न: आता वरावर गुन्हा दाखल!

Byjantaadmin

Dec 5, 2022

सोलापूर;-महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केले. माळेवाडी येथे शुक्रवारी हा विवाह पार पडला. दोन्ही बहिणी आयटी इंजिनिअर आहेत. या दोघीही लहानपणापासूनच मैत्रिणीप्रमाणे राहिल्या आणि आता पुढेही एकत्र राहण्यासाठी लग्न करत आहेत. दोघींनी अतुल नावाच्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक विचारत आहेत की, हे लग्न कायदेशीररित्या वैध आहे का? सध्या पोलिसांनी नवरदेवावर गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतुलचा मुंबईत ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय आहे. मुळचा तो माळेवाडी तालुक्यातील रहिवासी आहे. पिंकी आणि रिंकी यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानंतर दोन्ही बहिणी आईसोबत माळेवाडी तालुक्यात राहू लागल्या.

अशाप्रकारे अतुल जुळ्या बहिणींच्या जवळ आला
वडिलांच्या निधनानंतर बहिणींची आईही आजारी पडू लागली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी अतुलने आईला रुग्णालयात नेण्यास मदत केली. मग हळू हळू अतुल पिंकी आणि रिंकीजवळ आला. आता तिघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न केले आहे.

त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलीस सक्रिय झाले आणि वरावर कलम 494 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed