• Thu. May 1st, 2025

विलासरावांचा ‘तो’ किस्सा सांगत सतेज पाटलांनी दिला आठवणींना उजाळा

Byjantaadmin

Feb 18, 2024

लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमाला देशमुख कुटुंबासह राज्यातील काँग्रेसच्या सर्व दिग्ग्ज मंडळींनी हजेरी लावली. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या नेते मंडळीनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या विविध आठवणी व किस्से सांगत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी माजी मंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटलांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच्या काळातील अनेक किस्से सांगितले. मुख्यमंत्री असताना त्यांचा दिनक्रम कशा प्रकारचा होता. लातूरमध्ये आले की त्यांना कार्यकर्त्याचा गराडा कसा असत होता. ते नेत्यांची व कार्यकर्त्यांची कामे कशा पद्धतीने मार्गी लावत ते प्रत्येकांना कशा पद्धतीने खूष ते करीत होते, या आठवणीचा कप्पाच यावेळी उघडला.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सतेज पाटील हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्या काळातील किस्सा सांगताना ते म्हणाले की, विलासराव लातूरला आले की दिवसभरात पाच ते सहा कार्यक्रम ठरलेले असायची. प्रत्येक ठिकाणी मी पालकमंत्री या नात्याने मी उपस्थित राहत होतो. त्यावेळी मी व्यासपीठ किंवा सभास्थळी थोडंसं पाठीमागेच राहत होतो. मात्र, प्रत्येक कार्यक्रमात ते आदराने मला हात धरून व काही वेळा हात पकडून पुढे ओढायचे व जवळ बसण्यास सांगत होते. एवढेच नव्हे ते एक दोन ठिकाणी तर मला गाडीने येण्यास उशीर झाला. तर त्यांनी कार्यक्रम सुरु केला नाही तर माझी वाट पहात थांबले होते.

याबाबत मी त्यांना एकदा न राहून विचारले साहेब तुम्ही पदांने व वयाने देखील माझ्यापेक्षा मोठे आहात, मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, तरी तुम्ही मला प्रत्येक ठिकाणी सोबत कसे काय घेता ? अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले, मी उद्या असो किंवा नसो प्रत्येकांनी प्रत्येकांचा सन्मान केला पाहिजे. मी नसलो तरी कार्यकर्त्यानी पालकमंत्री या नात्याने प्रत्येक कार्यक्रमात मान सन्मान दिला पाहिजे, असे सांगत त्यांनी माझे डोळे उघडले. त्यामधून खूप मोठा संदेश दिला. तो संदेश मी आजही आचरणात आणतो.

विलासराव खूप काही शिकवण देऊन गेले

व्यासपिठावरील प्रत्येक नेत्यांची भाषण मी ऐकत आहे. प्रत्येक जण त्यांच्याकडून काही ना काही शिकला आहे. त्यामुळे आम्हा काँग्रेस कार्यकर्ते व पदधिकारी यांना प्रत्येक कामात सहकार्य करीत व प्रोत्साहन देत, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप जणांना घडवले. प्रत्येकाला खूप काही शिकवण ते देऊन गेले, असे गौरवाद्गार सतेज पाटील यांनी याप्रसंगी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *