निलंगा येथे सकल मराठा समाजाचे आमरण उपोषण सुरू
निलंगा- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे कायदा अधिवेश घेऊन पारित करावा या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती गंभीर होत असून उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. तसेच हैद्राबाद गॅझेट,बॉम्बे गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे.

व महाराष्ट्रभर मराठा आरक्षण संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला होता. या बंदला तालुक्यातील सर्व जनतेने पाठींबा देत मोठा प्रतिसाद दिला.हा लढा तीव्र करण्यासाठी निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे,यावेळी ईश्वर पाटील, किरण पाटील, माधव वाडीकर, वैभव गोमसाळे, राहुल बिराजदार आदी समाजबांधव यांनी आमरण उपोषण सुरू केले असून आजच्या पहिल्यादिवशी अनेक समाजबांधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा निर्धार उपोषणकर्ते यांनी केलेला आहे.