• Thu. May 1st, 2025

गोरगरिबांना अन्न आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा

Byjantaadmin

Feb 18, 2024

गोरगरिबांना अन्न आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा ..!

लालबाग-परेल (प्रतिनिधी)

दि.१७ फेब्रुवारी रोजी सिने-नाट्य दिग्दर्शक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी आपल्या लाडक्या मुलीचा आरवी (परी) चा आठवा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. आरवी तेटांबे (परी) ही परेल येथील प्रसिद्ध अशा के. एम. एस. डॉ.शिरोडकर प्रायमरी स्कूल मध्ये इयत्ता दुसरीत शिकत असुन तिला लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असल्यामुळे आपल्या प्रत्येक वाढदिनी आरवी आपल्या विभागातील गरजू आणि गोरगरिबांना खाद्यपदार्थ आणि उपजीविकेच्या वस्तू प्रदान करून आपलं कर्तव्य पार पाडत असते. याही वर्षी महेश्वर तेटांबे यांनी आपल्या मुलीच्या आरवी (परी) च्या आठव्या वाढदिवसा प्रित्यर्थ टाटा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल तसेच के ई एम हॉस्पिटल परिसरातील जवळजवळ ७५ ते ८५ गरजू गोरगरिबांना अन्न आणि पाणी बॉटल वाटून आपली सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य पार पाडले आह़े. आरवीच्या या अलौकिक समाजकार्याचे लालबाग परळ विभागात तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *