latur -१८ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विवेकानंद चौक ते बाभळगाव रस्ता या ठिकाणी अकराशे बावन्न फुल झाडे लावून एक आगळावेगळा पर्यावरण पूरक उपक्रम साजरा करण्यात आला.
ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्य गेली १७२४ दिवसापेक्षा जास्त दिवस अखंडपणे लातूर हरित करण्यासाठी व वृक्ष संवर्धन करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. विशेष म्हणजे हरित लातूर चे उद्देश सर्वांच्या सहकार्याने साध्य होत आहे. आज ग्रीन लातूर वृक्ष टीमचा प्रत्येक सदस्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून एक त्यांचा अनुयायी मावळा म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात अखंड, अविरतपणे सातत्याने हे कार्य कररत आहे. आज जवळपास अकराशे बावन्न फुल झाडांची मानवंदना देऊन हा रस्ता हरित करण्यात आला.

या शिवजन्मोत्सवानिमित्त यशवंत विद्यालय लातूर या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक संच व ग्रीन लातूर वर्ष टीम यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आलं. ही वृक्ष दिंडी यशवंत शाळा ते बाभळगाव चौक या ठिकाणी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमध्ये लहान मुलांच्या हातात फुलझाडे देऊन, घोषवाक्य चे फलक देऊन, ध्वज पताके व वेगवेगळ्या वेशभूषेमधील मुलांनी हा शिवजन्मोत्सव सोहळा फुलझाडे लावून साजरा केला .
आज ग्रीन लातूर वृक्ष टीमचा अखंड १७२४ वा दिवस शिवजन्मोत्सवाने साजरा करण्यात आला. या वृक्ष दिंडीत यशवंत शाळेची मुलं आणि ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य यांचा समावेश होता. ११५२ फुल झाडाच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. लावलेल्या फुलझाडांना टँकरद्वारे पाणी देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य आजचा हा दिवस साज करण्यासाठी व एक प्रामाणिक मावळा म्हणून कार्य करण्यासाठी सज्ज होता आणि हा कार्यक्रम यशस्वी रित्या साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजमहाराजांच्या आज्ञा पत्राचे मोठे फलक बनवून त्याचे वाचन करण्यात आले. यानुसार झाडे लावा, झाडे तोडू नका, वृक्ष संवर्धन करा या छत्रपती शिवाजी महाराजाच्या दूरदृष्टी पणाचे कौतुक करण्यात आले.