राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
निलंगा- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील ब यांचा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे रुग्णांना फळे वाटप करुन करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) निलंगा च्या वतीने सर्व रुग्णाची विचारपुस करुन फळ वाटप करण्यात आली.साहेबांना निरोगी व दिर्घायुष्य जीवनाच्या शुभेच्छा देवुन तसेच त्यांच्या जीवनात सुख शांति, व प्रगति लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करुन फळे वाटपास सुरुवात केली.

यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष सुधीर मसलगे , अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इस्माईल लदाफ ,जेष्ठ नेते वैजनाथ चोपणे, महीला प्रदेश सचिव महादेवी पाटील मोहन माने,युवक कार्याध्यक्ष महेश चव्हाण, , महीला शहराध्यक्षा मुन्नाबी मोमीन , लक्ष्मण क्षीरसागर, ,शिवराज अष्टूरे, बालाजी जोडतले सुरेश रोळे,लिंबराज बिराजदार,अलीबाबा चौधरी,पंकज शिंदे, निजाम शेख , जहांगीर फकीर, शंकर बनसोडे , बालाजी शिंदे , नसीम तांबोळी , व इतर राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा चे कार्यकर्ते, महीला व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सर्व उपजिल्हा रुग्णालय निलंगा चे डॉक्टर्स, परिचारिका यांचे सहकार्य लाभले राष्ट्रवादी च्या वतीने आभार मानन्यात आले.